आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Murder Issue At Amravati, Divya Marathi

अंजनगावच्या आठवडी बाजारात युवकाचा खून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंजनगावसुर्जी- आठवडी बाजारासाठी अंजनगाव येथे सोबत आलेल्या दोघांमध्ये जेवणाच्या पैशांवरून वाद झाला. त्यांचा वाद विकोपाला गेल्यानंतर बाजारातूनच चाकू विकत घेऊन सहकार्‍याला भोसकण्यात आले. सुधाकर देवीसिंह राठोड (35) असे मृताचे आणि बापूराव लक्ष्मण बेलसरे (44) असे मारेकर्‍याचे नाव आहे. सोमवारी दुपारी ते रुईफाटा येथून अंजनगावला आले होते. पोलिसांनी मारेकर्‍याला पंधरा मिनिटांतच अटक केली.
चिखलदरा तालुक्यातील रुईफाटा येथील रहिवासी सुधाकर राठोड व बापूराव बेलसरे यांचा आठवडी बाजारात दाखल होण्यापूर्वी गावातच पैशांवरून वाद होता. दुपारी बाजारात आल्यानंतर जेवणाच्या पैशांवरून पुन्हा वाद झाला. या वादावादीतच संतप्त झालेल्या बापूरावने बाजारातून चाकू विकत घेतला आणि सुधाकरच्या दिशेने झेपावत त्याच्यावर चाकूचे वार केले. भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे बाजारात पळापळ झाली. घटनेची माहिती मिळताच सुधाकरचा भाऊ रमेश राठोड यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी सुधाकरला मृत घोषित केले. घटनेनंतर पोलिसांनी सापळा रचून पंधरा मिनिटांतच मारेकरी बापूरावला अटक केली. रमेश राठोड यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.