आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Petrol Pump Owner, Robbery, Divya Marathi

घाटंजीत पेट्रोल पंपचालकाच्या घरी दरोडा, सहा लाख रूपयांची रोकड पळवली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ - घाटंजी शहराच्या मध्यवस्तीतील पेट्रोल पंपचालक दत्तात्रय मारावार यांच्या घरात घुसलेल्या सशस्त्र दरोडेखोरांनी मारावारच्या पत्नीला बांधून ठेवून सहा लाख रुपयांची रोकड असलेली बॅग हिसकावून नेली. ही घटना मारावार यांच्या निवासस्थानी रविवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास घडली.


घाटंजी येथे दत्तात्रय मारावार यांचा मारावार पेट्रोलपंप आहे. पेट्रोल पंपाच्या समोरच्या बाजूलाच त्यांचे घर आहे. रविवारी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास काही अनोळखी व्यक्ती हातात चाकू घेऊन त्यांच्या घरात शिरले. या वेळी मारावार यांच्या पत्नी घरात होत्या. या व्यक्तींनी त्यांना चाकूचा धाक दाखवून बांधून ठेवले. त्यानंतर घरातील एका बॅगेत असलेली सहा लाखांची रोकड घेऊन दरोडेखोरांनी पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच शहरात गस्त घालत असलेले पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. हा प्रकार पाहून त्यांनी तातडीने आरोपींचा शोध सुरू केला. मात्र, वृत्त लिहेस्तोवर दरोडा घालणार्‍यांचा कुठलाही थांगपत्ता लागला नव्हता किंवा या प्रकरणाची कुठलीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. मात्र, काही वेळातच ही बाब शहरात सर्वत्र पसरल्याने एकच खळबळ उडाली होती.