आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Plunderage Issue At Amravati, Divya Marathi

चाकूच्या धाकावर लुटले दीड लाख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- पंचवटी चौकानजीक कृषी महाविद्यालयासमोर गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास व्यापार्‍याला चाकूच्या धाकावर दीड लाख रुपयांनी लुटल्याची घटना उघडकीस आली आहे.

खरकाडीपुरा भागातील राजेश लक्ष्मणराव लोंढे हे रात्री घरी जात असताना तीन युवकांनी त्यांची दुचाकी अडवली. तिघांच्याही तोंडाला काळे रूमाल बांधले होते. त्यांनी लोंढे यांना चाकूचा धाक दाखवला आणि दुचाकीसह गाडीच्या डिकीतील एक लाख 22 हजारांची रक्कम घेऊन पळ काढला. एकूण एक लाख 57 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी तीन अज्ञात युवकांविरोधात गुन्हा दाखल केला.