आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौकशीअंती सोडली ‘ती’ साडेपाच लाखांची रक्कम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - कोतवाली पोलिसांना सोमवारी दुपारी नाकाबंदीदरम्यान एका कारमधून पकडलेली पाच लाख 67 हजार 930 रुपयांची रोकड चौकशीअंती सोडण्यात आली आहे. शहरातील एका कापड व्यावसायिकाची रक्कम असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी ही कार्यवाही केली.


चौधरी चौकात दुपारी 12 च्या सुमारास मारुती इको क ारची (एम. एच. 27 एआर/ 3964) तपासणी केल्यानंतर पोलिसांना ही रक्कम आढळली होती. श्रावण मोहोकर, चालक प्रकाश गुल्हाने व अन्य एक असे तिघे कारमध्ये होते. रक्कम शहरातील कापड व्यावसायिक अनिल नंदलाल खत्री यांच्या मालकीची असून, श्रावण मोहोकर हे त्यांच्याकडे सेल्समन आणि वसुली प्रनिनिधी म्हणून काम करतात. मोहोकर यांनी मध्यप्रदेश व जिल्ह्यातील काही ठिकाणाहून ही रक्कम वसूल क रून आणली असल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, निवडणूक काळात कारमध्ये अशा प्रकारे रक्कम वाहतूक करणे संशयास्पद असल्यामुळे पोलिसांनी सदर रक्कम, कार व कारमधील व्यक्तींना ठाण्यात आणले होते. अनिल खत्री यांचा कापडाचा होलसेल व्यवसाय आहे. भारत व सीमा साडी सेंटर त्यांचेच आहे. नेहमीच अशा प्रकारची वसुली क रून रकमेची वाहतूक केली जात असल्याचे मोहोकर यांनी सांगितले.

सोमवारी मोहोकर ही रक्कम घेऊन दुकानात जात असल्याचे पोलिसांना सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी श्रावण मोहोकर, प्रकाश गुल्हाने तसेच अनिल खत्री यांचा जबाब नोंदविला. चौकशीअंती ही रक्कम व्यवसायाची असल्याचे पुढे आल्यामुळे पोलिसांनी ही रक्कम सोडून दिली. नाकाबंदीदरम्यान ही रक्कम मिळाली होती. व्यावसायिक अनिल खत्री यांची रक्कम असल्याचे सांगण्यात आले होते. त्या दृष्टीने चौकशी केली. सदर रकमेचा राजकीय संबंध आढळून आला नाही किंवा चौकशीमध्ये काहीही संशयास्पद नव्हते. यातच वरिष्ठांनी आदेश दिल्यामुळे रक्कम सोडली आहे, असे शहर कोतवालीचे ठाणेदार विजय साळुंके यांनी सांगितले.