आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रूपालीच्या मृत्यूप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अंजनगावतालुक्यातील खोडगाव येथील रूपाली सतीश तुरखडे या विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी पती सतीश तुरखडे, चित्रा तुरखडे, नितीन तुरखडे बबन तुरखडे या चार आरोपींविरुद्ध अखेर रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेच्या दिवशी रूपालीच्या मृत्यू्प्रकरणी अंजनगावसुर्जी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केल्यानंतर तब्बल तीन दिवसांनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपींनी मृतक रूपालीला मारून विहिरीत टाकल्याचा आरोप तिचे काका राजेंद्र लंगोटे यांनी केला असून गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. थुंगाव पिंप्री (ता. चांदूर बाजार) येथील रूपालीचा विवाह २००८ मध्ये खोडगाव येथील सतीश तुरखडे यांच्याशी झाला होता.
‘ते’ दोघे कोण ? : रूपालीच्यामृत्यूनंतर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी तिच्या माहेरची मंडळी गेली असता तालुक्यातील दोन राजकीय नेते तक्रार दाखल करण्यात येऊ नये यासाठी पोलिसांवर दबाव आणत असल्याचा आरोप रूपालीच्या नातेवाइकांनी केला. दरम्यान, तक्रार नोंदवून घेण्यासाठीही टाळाटाळ केल्यामुळे पोलिसांची भूमिकाही संशयास्पद वाटत असल्याचा आरोप रूपालीच्या नातेवाइकांनी केला आहे.