आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Theft, Divya Marathi, Amravati

कोट्यवधीचा मालक लाखोंच्या चोरीत गजाआड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - शहरात कोट्यवधीची मालमत्ता असणार्‍या व्यक्तीला गुन्हे शाखा पोलिसांनी सोमवारी चोरीच्या आरोपात अटक केली. तारांकित हॉटेलमधून त्याने पाच दिवसांपूर्वी सोन्याचे दागिने असलेली बॅग चोरली होती. यातील 60 ग्रॅम दागिने एका सुवर्णकाराकडून जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या खळबळजनक खुलाशाने शहरात आश्चर्य व्यक्त होत आहे.


राजू त्रिलोकचंद तिवारी (40 रा. बापट चौक ह. मु. गणेडीवाल लेआउट) असे अटक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने राजू तिवारी याला रविवारी (दि. 23) मध्यरात्री संशयावरून गणेडीवाल लेआऊट परिसरातून चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांनीच चोरी केल्याची खात्री पटल्यानंतर अटक करण्यात आली. कॅम्प परिसरातील तारांकित हॉटेलमध्ये सिंधूनगरमधील कापड व्यावसायिकभिमन सुगणीलाल कुकरेजा यांच्या मुलीचा साखरपुडा कार्यक्रमादरम्यान बुधवारी (दि. 19) एका महिलेची बॅग चोरीला गेली होती. त्यामध्ये एक लाख 80 हजारांचे सोन्याचे दागिने, 40 हजार रुपयांचा मोबाइल आणि 20 हजार रोख, असा दोन लाख 40 हजारांचा ऐवज होता. या प्रकरणी कुकरेजा यांनी गुरुवारी (दि. 20) शहर कोतवाली पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी कार्यक्रमाच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, त्यामध्ये राजू तिवारी दिसत होता. मात्र, त्याला निमंत्रण नसल्याचे कार्यक्रम आयोजकांनी पोलिसांना सांगितले. त्यावरून संशय बळावल्याने पोलिसांनी राजू तिवारी याला रविवारी रात्री ताब्यात घेतले. चोरीची क बुली देताच त्याला अटक करण्यात आली. तिवारी याने बॅगमधील चोरीचे सोने शहरातीलच सुवर्णकाराला विकले होते. पत्नीची प्रकृती ठीक नसल्याने विकत असल्याने सांगितल्याने आपण ते दागिने घेतल्याचे सुवर्णकाराने पोलिसांना सांगितले. सुवर्णकाराकडून 60 ग्रॅम सोने (किंमत एक लाख 68 हजार) जप्त केले आहे. सोमवारी न्यायालयात हजर केले असता, तिवारी यास दोन दिवसांची पेालिस कोठडी सुनावण्यात आली. या दरम्यान चोरीतील उर्वरित ऐवज जप्त करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तिवारी याच्याकडे बापट चौकात कोट्यवधींची मालमत्ता असून, शहराबाहेरही मालमत्ता असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस निरीक्षक प्रमेश आत्राम, सहायक पोलिस निरीक्षक रवि राठोड, उपनिरीक्षक नितीन थोरात, ओमप्रकाश देशमुख, दीपक श्रीवास, संतोष शिखरे, दीपक दुबे, महेंद्र गावंडे यांनी ही कारवाई केली आहे.