आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Theft Issue At Amravati, Divya Marathi

मोर्शीत दुकान फोडून 60 हजार केले लंपास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोर्शी- शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या जयस्तंभ चौकातील दुकानाचे टीन काढून चोरट्यांनी गल्ल्यातील साठ हजार रुपये रोख लंपास केले. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. एकाच प्रकारे चोर्‍या होत असल्याने दुकानदारांमध्ये दहशत पसरली आहे.

येथील जयस्तंभ चौकात भय्या इंगळे यांचे नंदकिशोर एजन्सी हे प्रतिष्ठान आहे. चोरट्यांनी दुकानावरील टिनाचे नटबोल्ट काढून आत प्रवेश केला आणि गल्ल्यातील साठ हजारांची रोकड लंपास केली. सकाळी 11 वाजता दुकान उघडले असता, पैशाचा गल्ला काउंटरबाहेर आलेला होता. नोटांवरील कागद व रबर तेथेच काढलेले होते. दुकानाच्या मागील भिंतीला असलेल्या विटांच्या भगदाडाच्या साहाय्याने चोर छतावर चढले व टिनावरून दुकानात प्रवेश केला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. याप्रकरणी मोर्शी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ठाणेदार विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार अब्दुल सलाम तपास करीत आहेत.