आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Women Suicide Issue At Amravati, Divya Marathi

आजाराला कंटाळून नवविवाहितेने केली आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अंगावरची हळद सुकण्यापूर्वीच एका नववधूने स्वत:ला जाळून घेऊन जगाचा निरोप घेतला. तालुक्यातील चिंचोली (बु.) येथे बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

सपना नीलेश भेलकर असे मृतक महिलेचे नाव आहे. अकोट येथील या युवतीशी चिंचोली येथील नीलेश भेलकरचा विवाह गुरुवारी (दि. 1) झाला होता. विवाहनंतरचे सर्व धार्मिक विधी पार पडले. मंगळवारचा दिवस देवदेवातांचे दर्शन घेण्यात गेला. परंतु, नीलेश हा बुधवारी पहाटे पावणेपाचच्या सुमारास घराबाहेर पडला असता, सपनाने अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला जाळून घेतले. तिच्या आक्रोशाने आजूबाजूच्या लोकांनी येऊन तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. तिला तातडीने अंजनगावसुर्जी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी घटनेची नोंद केली. रहिमापूर ठाण्याचे ठाणेदार संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनामध्ये तपास करण्यात येत आहे.