अमरावती - नांदगावपेठनजीकच्या अंगोडा गावात दोन गटांत झालेल्या मारहाणीत तीन जण जखमी झाले. रविवारी दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली. मारहाणीच्या आरोपात विनोद पुंडलिक पंडित, प्रकाश विनोद पंडित, सागर विनोद पंडित, संजय महादेव पंडित आणि अंकुश अशोक पंडित यांना नांदगावपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. क्षुल्लक कारणावरून उद्भवलेल्या या वादात लाठी, काठी आणि शस्त्रास्त्रांनी ढोके परिवाराला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत दिनेश ढोके, दीपक ढोके आणि भाऊराव ढोके हे तीन जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अंगोडा गावात वीस पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गावात सध्या शांतता असल्याचे पोलिसांनी सांगितले.