आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दणका महापालिकेचा, रामगिरी, ईगलवर हातोडा!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- बेकायदा बांधकामाला लगाम लावण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मंगळवारी रेल्वे स्टेशन चौकातील ईगल रेस्टारेंट हॉटेल रामगिरीचे मोजमाप केले गेले. या मोजमापाचा अहवाल सायंकाळपर्यंत आयुक्तांकडे सोपवला जाणार होता. त्याद्वारे अतिरिक्त ठरणारे बांधकाम स्वत:हून पाडण्याची हमी संबंधित हॉटेलच्या संचालकांनी दिली आहे. तसे झाल्यास कोणत्याही क्षणी मनपा या बांधकामावर हतोडा चालवणार आहे. परवानगीपेक्षा अधिक किंवा परवानगी घेताच बांधकाम केल्याच्या माहितीवरुन मनपाच्या नगररचना विभागाने शहरातील काही इमारतमालकांना नोटीस धाडल्या आहेत.
महापालिकेच्या नोटीसनुसार संबंधित इमारतमालकांनी अतिरिक्त बांधकाम पाडले नाही. परिणामी त्या सर्वांची तपासणी करुन नकाशानुसार बांधकाम आहे किंवा नाही, याची पडताळणी आजपासून सुरु करण्यात आली. पहिल्या टप्प्यात हॉटेल रामगीरी ईगल रेस्टारेंटचे मोजमाप करण्यात आले. दुपारी दोन वाजेपर्यंत ही कारवाई सुरु होती. प्रारंभी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी भेट देऊन गिळंकृत झालेले पार्किंग इतर बांधकामाची पाहणी केली.
या कारवाईत सहायक आयुक्त प्रणाली घोंगे, नगररचना विभागाचे सहायक संचालक सुरेंद्र कांबळे, अतिक्रमणविरोधी विभागाचे प्रमुख गणेश कुत्तरमारे, पोलिस िनरीक्षक आर. के. खराटे, उपअभियंता घनश्याम वाघाडे, सुहास चव्हाण, अजय विंचुरकर, हेमंत महाजन, नितीन भटकर, मनोज शहाळे, नंदू तिखिले, अतिक्रमणविरोधी विभागाचे उमेश सवाई आदी सहभागी झाले होते.
पुढे काय होणार ?
सर्व इमारतींचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अतिरिक्त बांधकाम िकती ? ०.३ च्या वाढीव एफएसआयनुसार त्यातील नियमानुकूल होणारे किती आणि पाडावे लागणारे किती या प्रश्नांची उकल होईल. िशवाय हे बांधकाम जेव्हापासून केले गेले, तेव्हापासून त्याचा वापर झाल्यामुळे संबंधितांकडून करही वसुल केला जाणार आहे. वाढीव एफएसआयचा फायदा वरच्या माळ्यावरील बांधकामासाठीच असल्यामुळे सर्व इमारतींना पार्किंगच्या िठकाणचे अतिक्रमण मात्र काढावेच लागणार आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, हॉटेल मालकाला सुनावले मनपा आयुक्तांनी खडे बोल...