अमरावती- मोबाईलवरून महिलांना अश्लील एसएमएस पाठविण्याच्या युवकाच्या शौकामुळे एका नवविवाहितेवर
आपला संसार मोडण्याची वेळ आली आहे. बनावट नावाने घेतलेल्या सीम कार्डवरून अनेक महिलांना फोन करणाऱ्या अश्लील एसएमएस पाठवणाऱ्या या विकृत युवकाला पाेलिसांच्या सायबर क्राईम शाखेने शुक्रवारी (दि. ५) गजाआड केले.
जसवंत बच्छराम आहुजा (३५, रा. म्हाडा कॉलनी,अमरावती), असे या महाभागाचे नाव आहे. जसवंत हा खासगी दुकानात काम करतो. मागील तीन ते चार महिन्यांपासून त्याने बनावट नावाने सीम कार्ड खरेदी करून त्याद्वारे अनेक महिलांना फोन एसएमएस केले आहे. यातील अनेक महिलांना त्याने अश्लील एसएमएस अश्लील संभाषण केल्याचेही पोलिसांनी सांगितले .
जसवंतच्या अशा मनोवृत्तीमुळे आजवर शहरातील आठ ते नऊ महिलांनी पोलिसांत धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. त्याच्याविरुध्द शहरातील बडनेरा, शहर कोतवाली गाडगेनगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत. एका महिलेसोबत त्याने अतिशय अर्वाच्य भाषेत संवाद साधल्यामुळे तिच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी विनयभंग माहिती तंत्रज्ञान कायदानुसार (आयटी अॅक्ट)गुन्हा दाखल केला आहे. इतकेच नाही तर दोन महिन्यापुर्वी त्याने एका नवविवाहितेला त्रास द्यायला सुरूवात केली. त्या युवतीचा दोन महिन्यापुर्वीच विवाह झाला होता. तिचा नवा संसार सुरू असतानाच अश्लील एसएमएस फोन यायला लागले. हे नेमके कोण करीत आहे, याची माहिती त्या नववाहितेला नव्हती. मात्र ही बाब तिच्या पतीला माहीत झाली. पत्नी आपल्यापासून काही तरी लपवते आहे, असा गैरसमज झाल्याने पतीने त्या बिच्चारी नववधूला वडिलांकडे आणून सोडले.
अश्लील एसएमएस पाठवणारा कोण असा प्रश्न तीलाही भेडसावत होता. अखेर चार ते पाच दिवसांपुर्वी ती युवती पोलिसांना भेटली. तीने आपबिटी सांगितल्यानंतर सायबर क्राईमने त्या महाभागाचा शोध लावला आणि शुक्रवारी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून पोलिसांनी तीन सिमकार्ड मोबाईल जप्त केला आहे. ही कारवाई सायबर सेलचे प्रमुख एपीआय रवि राठोड त्यांच्या पथकाने केली आहे.
चार मोबाइल जप्त
सायबर क्राईमने गुरूवारी रात्री लोणी येथून एक मोबाईल जप्त केला आहे. राजापेठ ठाण्याच्या हद्दीत आठ दिवसांपुर्वी झालेल्या वाटमारीमध्ये हा मोबाईल गेला होता. या व्यतिरीक्त फ्रेजरपुरा ठाण्याच्या हद्दीतील वेगवेगळ्या प्रकरणातील तीन मोबाईल असे एकूण चार मोबाईल सायबर क्राईमने जप्त केले आहे.
भावाच्या नावावर सीम केले खरेदी
जसवंतने त्याच्या भावाच्या नावावर सिम कार्ड खरेदी केले आहे. याशिवाय आणखी दोन सिम त्याच्याकडे पोलिसांना मिळाले आहे. महीलांना फोन करण्यासाठी किंवा एसएमएस करण्यासाठी पत्नीचा मोबाईल वापरत असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. त्याला शहर कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल आहे.