आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दहीहंडी : ‘टोकाची भूमिका नको, हवा मध्यम मार्ग’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - जन्माष्टमीनिमित्त होणारे दहीहंडीचे कार्यक्रम रस्त्याच्या मधोमध घ्यायला हवे किंवा नाही, यावर नवीन वाद सुरू झाला आहे. तरुणाईचा उत्साह महत्त्वाचा, की नागरिकांना होणार्‍या अडचणी सोडवण्याला प्राथमिकता द्यावी, हा पेच निर्माण झाला आहे. जुने कार्यक्रम रस्त्याच्या मधोमध तर नव्याने कार्यक्रम करणार्‍यांना मैदानाचा रस्ता का दाखवायचा, या चर्चेनेदेखील जोर धरला आहे.

शहरात राजकमल चौकात नवयुवक विद्यार्थी संघटना, जयस्तंभ चौक येथे युवा सेना तर राजापेठ चौकात युवा स्वाभिमानच्या वतीने दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या तीनही कार्यक्रमांचे रस्त्याच्या मधोमध आयोजन होणार असल्याने पोलिसांचे टेंशन वाढले आहे. राजकमल चौकातील 29 ऑगस्टचा दहीहंडीचा कार्यक्रम झाल्यास 1 सप्टेंबर रोजी राजापेठ आणि युवा सेनेने जयस्तंभ चौकात दहीहंडी फोडण्याचा निश्चय केला आहे. पारंपरिक सणांचे आयोजन करण्यासाठी सामाजिक संघटना टोकाच्या भूमिकेतप्रत आल्या असताना शहरातील नागरिक मध्यम मार्ग काढण्याचा सल्ला देत आहेत. शहरातील नामवंतांनी दहीहंडी कार्यक्रम हा शांततापूर्ण व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे.