आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पेढी धरणग्रस्तांसाठी निर्मित सुविधांचे होतेय नुकसान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- जलसंपदा खात्यामार्फत पेढी धरणग्रस्तांकरिता निर्मित नागरी सुविधांचे अद्यापही हस्तांतरण झाले नसल्याने कोट्यवधीच्या या शासकीय मालमत्तेचे नुकसान होत आहे.
अमरावतीपासून सहा किलोमीटवर कठोरा गावानजीक भातकुली तालुक्यातील कुंड खुर्द आणि अळणगाव या दोन गावांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. यासाठी कठोरा ग्रामपंचायत हद्दीत शासकीय जागेत सुमारे नऊ कोटी खचरून नागरी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. यात गटग्रामपंचायत कार्यालय, शासकीय दवाखाना, शाळा, पाणीपुरवठा यंत्रणा, पाण्याची टाकी बांधून तयार आहे. वीजपुरवठा, पाणीपुरवठा यांसारख्या सुविधाही देण्यात आल्या आहेत.
दोन गावांपैकी कुंड खुर्द येथील गावकर्‍यांना भूखंडांचे पट्टे वितरित करण्यात आले. यानंतरही पुनर्वसित गावातील गावकरी अद्यापही नवीन जागेत स्थानांतरित झालेले नाहीत. कुंड खुर्द येथील गावकरी कठोरानजीक पुनर्वसनाच्या जागेत घरे बांधू शकतात, असे जलसंपदा विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील पुनर्वसन विभागाने स्पष्ट केले आहे.
नागरी सुविधांचे हस्तांतरण नाही
निर्माण करण्यात आलेल्या नागरी सुविधांचे कठोरा ग्रामपंचायतीला हस्तांतरण झालेले नाही. यामुळेच मोठय़ा प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्या कंत्राटदाराला नागरी सुविधा निर्माण करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे, त्यालाच त्या कठोरा ग्रामपंचायतीला हस्तांतरित कराव्या लागतील, असे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.