आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कठडे गूल; धोकादायक पूल, शहरातील कठड्यांची अवस्था दयनीय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरात विविध कॉलनी परिसरातून नाले वाहतात. या नाल्यांवर असलेल्या पुलांना काही ठिकाणी कठडे आहेत, तर काही ठिकाणचे कठडे गायब झाले आहेत. सायकल किंवा पायी प्रवास करणारे शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ वाहनचालक यांच्यासाठी हे पूल धोक्याचे ठरू शकतात. रस्त्यावर पूल दर्शवणारी पाटी किंवा रिफ्लेक्टर नसल्याने रात्री प्रवास करणारे नवीन वाहनचालक गोंधळतात.

शहरातील बऱ्याच भागांत संरक्षक कठडे नसलेले धोकादायक पूल आहेत. काही पुलांवर अत्यंत कमी उंचीचे कठडे बांधलेले आहेत, तर काही ठिकाणी बांधलेले लोखंडी कठडे तोडून चोरट्यांनी लोखंड लांबवले आहे. शालेय विद्यार्थी, वाहनचालक ज्येष्ठांसाठी असे पूल धोकादायक ठरू शकतात. महापालिकेने याची दखल घेण्याची गरज अाहे.
वडाळी परिसरातील पुलावर बऱ्याचदा शाळकरी विद्यार्थी शाळा सुटल्यावर खेळताना आढळतात. न्यू बेलपुरा हायस्कूलजवळील पूलही असाच धोक्याचा आहे. काही ठिकाणच्या पुलांवर चक्क कठडेच दिसत नाहीत, तर कुठे अतिशय कमी उंचीचे कठडे आहेत. बऱ्याच भागात पालिका प्रशासनाने लोखंडी कठडे बसवलेही. मात्र, चोरत्यांना तेदेखील पुरले नाहीत. त्यातील लोखंड लोकांनी पळवले आहे. गांधीनगर, समर्थ कॉलनीतील पुलावर सिमेंट कठडे बांधण्यात आले आहेत. मात्र, येथील कठडा तोडून त्यातील लोखंडी गज लांबवल्याचे लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने आवश्यक तेथे पक्के कठडे बसवून अपघाताचे धोके टाळावे लोकांनीही सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करावे, असे मत ज्येष्ठांनी व्यक्त केले अाहे.

चोरट्यांनी पळवले लोखंडी कठडे : शहरातीलबहुतेक पुलांवर लोखंडी कठडे बसवण्यात आले आहेत. मात्र, कठड्यांमधील जो भाग तोडता येतो, तो चोरट्यांनी तोडून नेला आहे, अशी माहिती त्या-त्या भागातील रहिवासी देतात.
ना सूचना, ना रिफ्लेक्टर : ‘पुढेपूल आहे,’ असे दाखवणारी सूचना किंवा रिफ्लेक्टर नसलेले पूलही शहरातील नाल्यांवर पहायला मिळतात. त्यामुळे रात्री प्रवास करताना नवीन वाहनचालकांची गैरसोय होते, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
शाळकरी विद्यार्थ्यांसाठी धोकादायक : शहरातीलकाही शाळांच्या परिसरातही कठडे नसलेले धोकादायक पूल आहेत. मधल्या सुटीत, शाळा सुरू होण्यापूर्वी सायंकाळी मुले पुलाभोवती खेळतात. कठडे नसल्याने अशा ठिकाणी अपघात होण्याची शक्यता असते. धोक्याच्या ठिकाणी खेळू नका, असे मुलांना वारंवार सांगावे लागते, अशी प्रतिक्रिया बेलपुरा भागातील मोहन इंगळे या व्यावसायिकाने दिली.
संघटनांनीघेतला पुढाकार : शिवगर्जनायुवा संस्था, मैत्री विद्यार्थी संघ या संघटनांनी या विषयी पुढाकार घेतला आहे.

कठडे तर गरजेचेच
शहराचीलोकसंख्या वाढती आहे. लोकांना रस्ते अरुंद पडतात. एका पुलाहून शेकडो नागरिक दररोज प्रवास करतात. त्यामुळे पुलांवर कठडे तर आवश्यकच आहेत. द्वारकामेश्राम, ज्येष्ठ नागरिक