आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहराची आरोग्य यंत्रणा होणार आणखी सशक्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या इर्विन, डफरीन रुग्णालयांच्या विकासाकरिता २७ कोटी रुपयांचा िनधी प्राप्त झाला आहे. या िनधीतून दोन्ही रुग्णालयांतील प्रलंबित कामे मार्गी लागणार असल्याने शहराची आरोग्य यंत्रणा आणखी चोख हाेणार आहे. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी प्राप्त झालेल्या या निधीबद्दल माहिती दिली.
दोन्ही रुग्णालयांतील सेवा आधुनिक करण्यासाठी निधीची मागणी करण्यात आली हाेती. हा निधी प्राप्त झाला आहे. लवकरच त्यातून आवश्यक ती सर्व प्रस्तावित कामे सुरू करण्यात येणार आहेत. इर्विनच्या तुलनेत डफरीनची व्यवस्था, सफाई जास्त चांगली असल्याचे मत गित्ते यांनी प्रकर्षाने नोंदवले. इर्विन आणि डफरीनमध्ये निधी अभावी बंद पडलेले काही विभाग, शल्यगृह तातडीने सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. प्राप्त झालेला निधी मार्चपर्यंत दोन्ही रुग्णालयांच्या खात्यात जमा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. डफरीनच्या मागील बाजूस असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांचाही आढावा घेण्यात येत आहे. तेथील कामांचा वेग मंदावू नये आणि दुसऱ्या टप्प्यातील कामकाज नियोजित वेळेत पूर्ण होईल, अशी अाशा गित्ते यांनी व्यक्त केली.
आरोग्य यंत्रणा चोख राहावी, यासाठी जिल्हा प्रशासन सातत्याने राज्य शासनाच्या अारोग्य विभागाच्या संपर्कात आहे.
वेळोवेळी स्थानिक लोकप्रतिनिधीही पाठपुरावा करीत आहेत. त्यामुळे आगामी काळात काही नवीन आधुनिक वैद्यकीय सुविधा अमरावतीला प्राप्त होण्याची अाशाही जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.