आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Daryapur Adarsh High School Students Win Yoga Competition

योगपटू वैष्णवी, हेमंतने घडवला "सुवर्ण योग'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - दर्यापूर आदर्श हायस्कूलच्या वैष्णवी जावंदेने सर्वांगसुंदर अचूक योगासनं सादर करून ११७ गुणांसह जिल्हा शालेय ग्रामीण गट योगासन स्पर्धेत मुलींच्या १७ वर्षांखालील विभागात अजिंक्यपद पटकावले. मुलांच्या १७ वर्षांखालील गटात गुरुदेव विद्यामंिदर, मोझरीच्या हेमंत साबळेने दर्जेदार कामगिरी करून ९६ गुणांसह सोनेरी पदक जिंकले.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे विभागीय क्रीडा संकुलात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत मुलींच्या १७ वर्षांखालील विभागात आदर्श हायस्कूल दर्यापूरच्या ट्विंकल पासोडेने ११७ गुणांसह वैष्णवीला तुल्यबळ लढत दिली. मात्र, तांत्रिक बाबतीत सरस ठरल्यामुळे वैष्णवी विजेती ठरली, तर .व्टिंकलला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. हर्षदा वाघमारेने ११४ गुणांसह तृतीय, पूर्वा सोळंकेने १०७ गुणांसह चतुर्थ आणि संत गाडगेबाबा विद्यालय, आमलाच्या स्नेहा प्रजापतीने ८९ गुण मिळवून पाचवा क्रमांक अर्जित केला. मुलांच्या १७ वर्षांखालील गटात गुरुदेव विद्यामंदिर मोझरी येथील हेमंत साबळेने ९६ गुण प्राप्त करून अव्वल क्रमांक मिळवला. त्याचा सहकारी देवेंद्र काळेला ९३ गुणांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अंजनगाव बारी येथील जनता विद्यालयाच्या हृषीकेश छकुलेने ८० गुणांची कमाई करून तृतीय स्थान पटकावले.
गुरुदेव विद्यामंदिरच्या निखिल इंगोलेने ७७, पुष्पक परतेकीने ७५ अनुक्रमे चौथा पाचवा क्रमांक पटकावला. स्पर्धेदरम्यान बृहन्महाराष्ट्र योग परिषदेचे सरचिटणीस डॉ. अरुण खोडस्कर, मुख्य प्रशिक्षक प्रा. शशिकांत येवतकर, मंगला दळवी, दर्यापूर, प्रा.राजीव कांडलकर, पुसद, संजय देशमुख,वर्धा, जयश्री गायधने, कल्पना मालविय, चवाळे, रत्नमाला मनोहरे, प्रतिभा ढोक ही पंच मंडळी अन् क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे, संजय कथळकर, क्रीडा मार्गदर्शक दर्शना पंडित, योगेश शिर्के, सचनि मिलमिले, सुहास खांडेकर, शीतल राऊत, शुभम मोहतुरे, अजय केवाळे प्रामुख्यानेे उपस्थित होते.