आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खून प्रकरणी मायलेकाला जन्मठेप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मद्यप्राशन करण्यासाठी दोन हजार रुपये खर्च केल्याच्या कारणावरून झालेल्या खूनप्रकरणात पंकज रामचंद्र मेश्राम (वय,२२) सुनंदा रामचंद्र मेश्राम (४०. दोघे रा. नांदुरा बु.) यांना न्यायालयाने गुरुवारी (दि.५) जन्मठेप एक हजार रुपये दंड आणि दंड भरल्यास दोन महिन्यांचा कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
जिल्हा न्यायालय क्रमांक चारचे न्यायाधीश एस. एम. भोसले यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. वलगांव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नांदुरा बु. येथे मृतक रामचंद्र गोविंदराव मेश्राम (४५) यांच्या राहत्या घरी २४ जून २०१३ रोजी ही घटना घडली होती. रामचंद्र यांचा मुलगा पत्नी सुनंदा यांनी त्यांना गळा आवळून ठार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी विधीतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार रामचंद्र यांनी घटनेच्या सात दिवसांपूर्वी गावातीलच प्रकाश भोकरे यांना म्हैस विकली होती. म्हशी विकण्याचा व्यवहार झाला, तेव्हा प्रकाशने दोन हजार रुपये रामचंद्राला अॅडव्हांस म्हणून दिले होते. उर्वरित रक्कम घटनेच्या दिवशी देण्याचे ठरले होते. दरम्यान, २४ जूनला रामचंद्र त्याची पत्नी सुनंदा दोघेही रक्कम घेण्यासाठी प्रकाशच्या घरी गेले. प्रकाशने १५ हजार रुपये रामचंद्र यांच्या हाती ठेवले. त्यातील दोन हजार स्वत:जवळ ठेवून उर्वरित १३ हजार रुपये त्यांनी पत्नी सुनंदाकडे दिले.

दरम्यान, घटनेच्या दिवशी दुपारी बारा वाजताच्या सुमारास नांदुरा बसस्थानकावर रामचंद्र हे दारूच्या अवस्थेत असल्याचे मुलगा पंकजच्या निदर्शनास आले. तेव्हा पंकजने त्याच ठिकाणी रामचंद्र यांना लाथाबुक्यांनी मारहाण करत फरफटत घरी आणले होते. तथापि, सायंकाळच्या सुमारास रामचंद्रची पत्नी त्याचा मुलगा पंकज यांनी पुन्हा रामचंद्र यांना लाथा-बुक्कांनी जबर मारहाण केली.