आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जंगलात आढळला 35 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - साईनगर परिसरातील वृंदावन कॉलनीच्या मागील बाजूस असलेल्या जंगलामध्ये एका नाल्यात शनिवारी युवकाचा मृतदेह आढळला. या प्रकरणी घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कॉलनी परिसरापासून अर्धा किलोमीटरवर असलेल्या नाल्यातील चिखलात बुडालेला मृतदेह आढळला. पोलिसांना सायंकाळपर्यंत ओळख पटवण्यात यश आले नव्हते. मृतकाच्या अंगावर जर्कीन, पॅन्ट आणि शर्ट आहे तसेच पायात काळ्या रंगाचे बूट आहेत.

मृतकाच्या शरीरावर काही खाणाखुणा आढळल्या नाहीत. मात्र, मृतदेह असलेले ठिकाण लक्षात घेता, हा घातपात असू शकतो. त्याचा मृत्यू 24 तासांच्या आतच झाला असावा, असा अंदाज घटनास्थळावर आलेल्या पोलिसांनी व्यक्त केला आहे.

स्वच्छ केल्यावरच पुढील दिशा निश्चित : मृतदेह चिखलात माखला आहे. त्यामुळे त्याची ओळख पटली नव्हती. अंदाजे वय 35 वर्ष असावेत, इतकाच अंदाज पोलिसांना लावता आला. त्याच्या शरीरावर काही खाणाखुणा आहेत का, हे या मृत्यूमागचे नेमके कारण शोधण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे चिखलाने माखलेला हा मृतदेह स्वच्छ केल्यानंतरच पोलिसांना तपासाची दिशा निश्चित करता येणार आहे.