आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Demonstrators Go Back, Suddenly Jumped On Collector Vehicle

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आंदोलक माघारी फिरले; कलेक्टरांच्या कारवर चढले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: निवेदन देऊन बाहेर पडलेल्या नवसारीवासीयांनी अचानक जिल्हाधिका-यांचे वाहन अडवत आक्रमक पवित्रा घेतल्याने येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
अमरावती - जिल्हाधिका-यांनानिवेदन दिल्यानंतर घराकडे मार्गस्थ झालेले नवसारीवासी अचानक माघारी फिरले थेट जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या शासकीय वाहनावर चढले. एकाएकी झालेल्या या आंदोलनामुळे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात चांगलीच खळबळ उडाली. पोलिसांसमवेत महसूल कर्मचा-यांची ही धावपळ झाली. अखेर गित्ते यांना दुस-या कारमधून कार्यालयाबाहेर पडावे लागले.

नवसारी येथील देशी दारूचे दुकान अन्यत्र स्थलांतरित करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. वडाळी येथील महिलांचा लढा यशस्वी झाल्यानंतर नवसारीतील आंदोलनातही महिलांनी आघाडी घेतली आहे. मंगळवारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अमोल इंगळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन नियोजित होते. आंदोलनात अॅड. उमेश इंगळे, सविता भटकर, संजय गायकवाड, अॅड. दीपक सरदार, मनोज थाेरात यांच्यासह नवसारीतील सुमारे दीडशे नागरिक सहभागी झाले होते. दुपारच्या सुमारास हे आंदोलक जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना निवेदन देण्यासाठी त्यांच्या कक्षात आले. निवेदन देऊन बाहेर पडले अचानक आंदोलनाचे स्वरूपच बदलले.

दोनमहिन्यांपासून लढा
नवसारीयेथील महिलांनी देशी दारूचे दुकान स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे. सुमारे दोन महिन्यांपासून ही मागणी होत आहे. गाडगेनगर पोलिस ठाणे, पोलिस आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभाग जिल्हाधिका-यांना दोनदा निवेदन अशा मार्गाने त्यांनी आपली मागणी आतापर्यंत रेटून धरली आहे.

आंदोलकांविरुद्धगुन्हा दाखल
जिल्हाधिका-यांचीकार अडवणा-या आंदोलकांविरुद्ध गाडगेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार आता पुढील कारवाई होणार आहे.

सातदिवसांचा अल्टीमेटम
दारूदुकान हटवण्यासाठी प्रशासनाला सात दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. त्यानंतरही दुकान हटवल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाला त्यापूर्वीच ठोस काय तो निर्णय घ्यावा लागणार आहे.
गित्ते यांना दुस-या कारने रवाना व्हावे लागले. जिल्हाधिका-यांच्या कारला घेरा घातलेले आंदोलक पुन्हा मंडपाकडे रवाना झाले.
आंदोलक ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. त्यामुळे अखेर कर्मचा-यांनी पोलिसांच्या मदतीने गित्ते यांना कक्षात आणले.
महसूल कर्मचारी, पोलिस यांनी गित्ते यांना सुरक्षित केले. त्यानंतर आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला.
गित्ते कारमधून उतरले. काही बोलायचे असल्यास आपण तयार आहोत, असे सांगितले. परंतु आंदोलक ऐकत नव्हते.
जिल्हाधिकारी किरण गित्ते शासकीय कारने रवाना होत होते. कार पोर्चमधून बाहेर येत नाही, तोच एका महिलेने कार अडवली.
शिष्टमंडळाचे निवेदन देणे, चर्चा आदी सुरू होती. सकारात्मक चर्चा झाली. जिल्हाधिका-यांनी नागरिकांना न्याय देण्याची ग्वाही.
धरणे देणा-या नवसारीवासीयांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात आले.

योग्य मार्गान्वये होणार कार्यवाही
महसूलविभाग नागरिकांच्या समस्यांबाबत संवेदनशील आहे. नागरी समस्येबाबत जिल्हाधिका-यांनी वेळोवेळी योग्य मार्गान्वये संबंधितांना कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. या बाबतीतही तसेच होईल. तेजूसिंगपवार, निवासी उपजिल्हाधिकारी

किती प्रतीक्षा ?
आम्हीदोन महिन्यांपासून योग्य मार्गानेच निवेदनातून मागणी मांडत आहोत. दोन महिन्यांचा कालावधी एखाद्या कारवाईसाठी पुरेसा आहे. आज लोकांचा संयम सुटला. वर्षानुवर्ष प्रतीक्षाच करावी का? कारवाई कधी करणार? अमोलइंगळे, रिपाइं

नियमाने कारवाई
जिल्हाधिकारीकार्यालयात झालेल्या आंदोलनप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी नियमानुसार पुढील तपास केला जाईल. जिल्हाधिका-यांचे वाहन अडवणे चुकीचे आहे. कैलासपुंडकर, ठाणेदार गाडगेनगर पोलिस ठाणे.