आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंग्यूच्या प्रकोपासाठी ‘मजीप्रा’च जबाबदार!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - डेंग्यूच्या वाढत्या प्रकोपासाठी महाराष्ट्र जीवन प्राधकिरण जबाबदार असून, दोषी अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केली आहे. मंगळवारी याबाबतचे एक निवेदन जिल्‍हाधिकारी किरण गित्ते यांना सोपवण्यात आले. रायुकाँचे ग्रामीण जिल्‍हाध्यक्ष तथा जिल्‍हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संतोष महात्मे भातकुली पंचायत समितीचे माजी उपसभापती अजिज पटेल यांच्या नेतृत्वात हे निवेदन सोपवण्यात आले.
निवेदनात केलेल्या आरोपानुसार, मजीप्राची पाइपलाइन अनेक ठिकाणी फुटली (लीक) आहे. त्यामुळे पिण्‍याच्या पाण्यात गढूळ पाणी िमसळले जाते. शिवाय पाइपलाइनमध्ये असलेल्या तांत्रिक दोषांमुळे काही गावांना नियमित पाणी मिळत नाही. परिणामी, सहा-सात दिवसांतून एकवेळा पाणीपुरवठा केला जातो. याचा विपरीत परिणाम होऊन नागरिकांना आठवडाभर पाणी साठवून ठेवावे लागते. डेंग्यूचे डास साठवलेल्या पाण्यातच राहात असल्याने डासांच्या प्रादुर्भावासाठीही मजीप्राच जबाबदार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
निवेदन सोपवताना महात्मे अजिज पटेल यांच्याशिवाय वाठोड्याचे सरपंच राजेद्र बोडखे, ग्रामपंचायतीचे सदस्य निजाम, शकील, अब्दुल शकील अब्दुल हारून, पंचायत समितीचे माजी सदस्य अ. अजिज अ. मजीद आदी उपस्थित होते.
बॅनर्जीयांच्या नेतृत्वात समिती : संतोषमहात्मे अजिज पटेल यांनी सादर केलेले निवेदन आणि त्यानंतर त्यांच्याशी झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने जिल्‍हाधिकारी किरण गित्ते यांनी एक समिती गठित केली. जिल्‍हा परिषदेच्या पाणीपुरवठा *विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वात नेमलेल्या या समितीकडून तत्काळ अहवाल मागवण्यात आला आहे. मजीप्राच्या वाहिनीतील लीकेज, अनियमित पाणीपुरवठा इतर अनुषंगिक बाबींेचे प्रतिबिंब त्यामध्ये उमटणार आहे.
पाच मुलांना लागण
माझ्यागावात नेहमीच अनियमित पाणीपुरवठा होतो. परिणामी, पाण्याचे दुर्भिक्ष आहे. यातूनच वाढलेल्या साठवणुकीमुळे सध्या पाच घरांमध्ये आजारांची लागण झाली. जीशान अली शौकत अली, सीमा नदीम नबाब नाझीया नईम शेख या तिघांना डेंग्यूची, तर वजीरोद्दीन अब्दुल गनी अब्दुल शहीद अ. साजिद या दोघांना डायरियाची लागण झाली आहे. या सर्वांवर अमरावतीच्या जिल्‍हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे मजीप्राचे पाणीपुरवठा धोरण माझ्यासाठी फार गंभीर विषय बनला आहे. संतोषमहात्मे, माजीउपाध्यक्ष, जि.प. अमरावती.