आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Department Of Culture,Latest News In Divya Marathi

जिल्हा तेथे नाट्यगृह’ योजना राबवणार- लक्ष्मीकांत खाबिया यांची माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- जिल्हा तेथे नाट्यगृह संकल्पनेनुसार भविष्यातील कामकाजाची आखणी केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी दिली. जिल्ह्यातील तालुकाध्यक्षांची घोषणा करण्यासाठी खाबिया मंगळवारी येथे आले होते.
ते म्हणाले, कलावंतांना योग्य मंच मिळवून देण्यासाठी राकाँची धडपड सुरु आहे. पहिल्या टप्प्यात साहित्य, कला व सांस्कृतिक मंच स्थापन करण्यात आला असून त्याचे जाळे राज्यभर पसरविण्यात आले आहे. त्यांच्यामते गाव तेथे नाट्यगृह असले पाहीजे. त्यासाठी राज्याचे सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून ग्रामपंचायती, नगरपालिका, महापालिका यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून हे केले जावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजीत पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनानुसार कलावंतांना योग्य मंच मिळवून देण्यासाठी सांस्कृतिक विभाग कार्यरत आहे. या अंतर्गत खाबिया यांनी राज्यव्यापी दौरा आखला असून ठिकठिकाणी संघटनेचे जाळे विस्तारले जात आहे.

पत्रकार परिषदेला संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील वर्‍हाडे, माजी जिल्हाध्यक्ष विजयराव भैसे व नाना बोंडे, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. शरद तसरे, नंदकुमार बंड, उज्‍जवल थोरात यांच्यासह पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती.