आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘डीपी’तील निरर्थक जागा घेण्यास महापालिकेचा नकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमरावती - प्राथमिक शाळा व्यवसायिक संकुलासाठी ‘डीपी’त (विकास आराखडा) स्वतंत्रपणे आरक्षीत आसलेले भूखंड सध्यस्थितीत निरर्थक ठरल्याने ते खरेदी करण्यास मनपाने आखेर नकार दर्शविला आहे. हे दोन्ही भूखंड खासगी मालकीचे होते. मनपा स्थायी समितीच्या सभेत शुक्रवारी एकमताने हा िनर्णय घेण्यात आला.

पहिला भूखंड बडनेरा नवी वस्तीलगतच्या फुकटनगर झोपडपट्टी येथील आहे. वल्लभ िसकची यांच्या मालकीच्या जागेत आसलेल्या या भूखंडावर मनपाने प्राथमिक शाळेचे आरक्षण (डीपी) नोंदवले होते. परंतु सुमारे २५ आर क्षेत्रफळात आसलेल्या या भूखंडावर मोठ्या प्रमाणात आतिक्रमण झाले आहे. त्यामुळे तो विकत घेऊन काय उपयोग? आसे म्हणत प्रशासनाने त्याच्या आधीग्रहणास नकार दर्शविणारा विषय स्थायी समितीसमोर मांडला. समितीने त्यास मान्यता दिली आहे.

फुकटनगरसारखाच दुसरा भूखंड आमरावतीच्या राजापेठचा आहे. गोपाल टॉकीजसमोरच्या या प्लॉटवर सध्या एक शेड उभे करण्यात आले आहे. नरेश साहू राठोड यांच्या मालकीच्या या प्लॉटवर व्यापारी संकुल उभे करण्याचे मनपाने ठरवले होते. तशी डीपीही होती. परंतु भविष्यात त्याच जागेच्या आजूबाजूला होणारा रेल्वे उड्डाणपूल (आरओबी) त्यामुळे बांधकाम करताना सोडावी लागणारी जागा या कारणास्तव व्यापारी संकुल उभे होणार नाही, आसे मनपा प्रशासनाचे निरीक्षण आहे. त्यामुळे नगरसचना विभागाच्या सहायक संचालकांकडून आजच्या सभेत स्थायी समितीसमोर तसा विषय ठेवण्यात आला. परिणामी ६९४ चौरस मीटर आसलेल्या या जागेवरही मनपाने पाणी फेरले आहे.

पीठासीन सभापती विलास इंगोले यांच्या आध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेला स्थायी समितीचे बहुतेक सदस्य उपस्थित होते. बैठकीत आणखीही एक महत्त्वाचा िनर्णय घेण्यात आला. त्यानुसार पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना गणवेश शूज पुरविण्यात येणार आहेत. सभापती विलास इंगोले यांनी स्वत:च या विषयासाठी पुढाकार घेतला होता.

दर करार आयुक्तांकडेच : शुक्रवारच्या बैठकीत दर करारा संबंधीचाही विषय होता. परंतु त्यावर आंतीम निर्णय घेण्याऐवजी स्थायी समितीने तो परत पाठवला. दर करारासंदर्भातील निर्णय आयुक्तांच्या स्तरावर ठरवून नंतरच ते विषय स्थायी समितीसमोर आणण्याचे सूचविण्यात आले आहे.

दोन्ही उपायुक्त, सहायक आयुक्त आनुपस्थित
शुक्रवारच्या सभेला मनपाचे दोन्ही उपायुक्त विनायक औगड चंदन पाटील आनुपस्थित होते. दोघांपैकी कुणीतरी एकाने उपस्थित राहले तरी चालले आसते. मात्र आयुक्तांच्या आनुपस्थितीमुळे त्या दोघांनाही वेगवेगळ्या जबाबदार्‍या सांभाळाव्या लागल्या. त्यामुळे ते या सभेला आनुपस्थित होते. याशिवाय पाच पैकी दोन सहायक आयुक्तही आनुपस्थित होते.