आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Devising Khulpute Well Out From The Wells, Divya Marathi

म्हणतात ना, ‘देव तारी, त्याला कोण मारी?’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरुड- ‘देव तारी, त्याला कोण मारी?’ या म्हणीचा प्रत्यय प्रतिष्ठित नागरिक देवीसिंह खुटपळे यांच्या रूपाने जरुडवासीयांनी घेतला. 60 फूट खोल विहीर, त्यात 15 फूट पाणी आणि पोहणं मुळीच येत नाही, अशा भयावह परिस्थितीही ते विहिरीमधून सुखरूप बाहेर आले.
जरुड येथील उत्क्रांती मंडळाचे अध्यक्ष देवीसिंह खुटपळे हे गावालगतच्या शेतातील विहिरीत पाय घसरून पडले. या विहिरीची खोली 60 फूट आहे, तर 45 फुटांवर तिला पाणी आहे. पाण्यात बुडत असताना त्यांच्या हाताला मोटरपंपचा पाइप लागला. त्यांनी तो पाइप पकडून डोके पाण्याबाहेर ठेवण्यात यश मिळवले. पोहता येत नसल्याने त्यांची कोंडी झाली होती. विहिरीला पायर्‍या नसल्याने वर जायचे कसे, हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. शिवाय खिशातील मोबाइल भिजल्याने कुणाला सांगावे कसे, हाही प्रश्न होता. तरीही स्वत:चा तोल सांभाळत त्यांनी मोबाइल हाताळण्याचा प्रयत्न केला. तो भिजल्याने बंद पडला होता. दरम्यान, 20 मिनिटांनी त्यांनी पुन्हा मोबाइल हाती घेतला तेव्हा तो सुरू झाला. खुटपळे यांनी कुटुंबीयांना विहिरीत पडल्याची माहिती दिली. कुटुंबीयांसह गावकर्‍यांनी तातडीने विहिरीकडे धाव घेऊन त्यांना दोरीच्या साहाय्याने बाहेर काढले. बाहेर येताच त्यांच्या डोळ्यांतून अश्रू तरळले.
देवीसिंह खुटपळे हे शरद उपसा जलसिंचनचे अध्यक्ष आहेत. जनसामान्यांसाठी वेळप्रसंगी धावून जाणे, हाच सेवाभाव त्यांच्या उपयोगी आल्याची र्शद्धाळू भावना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक शेषराव खाडे यांनी व्यक्त केली.
जनसेवाच आली त्यांच्या कामी