आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिनेशकुमार त्यागी अमरावतीचे नवीन मुख्य वनसंरक्षक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक के. पी. सिंग यांची विनंतीवरून बदली झाली असून त्यांच्या जागी यवतमाळचे मुख्य वनसंरक्षक दिनेशकुमार त्यागी अमरावतीत आले आहेत. के. पी. सिंग यांनी पदाचा कार्यभार मुख्य वनसरंक्षक प्रादेशिक मोहन झा यांच्याकडे सोपवला आहे.

बुधवारी राज्य शासनाच्या महसूल व वनविभागाच्या सात वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये विदर्भातील सहा अधिकार्‍यांचा समावेश आहे. के. पी. सिंग यांची विनंतीवरून ठाणे येथे बदली झाली आहे. त्यांनी 6 मे 2012 ला मेळघाटातील धुरा सांभाळली होती. वर्षभराच्या काळात त्यांनी व्याघ्र प्रकल्पातील 10 गावांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा केला. याशिवाय व्याघ्र शिकार रोखण्यासाठी आवश्यक उपायोजनाही केल्या. वन्यतृणभक्षी प्राण्यांसाठी आवश्यक कुरण त्यांनी तयार करून घेतले आहे.