आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खेळाडू आणायचे कोठून! शारीरिक शिक्षक, क्रीडा मार्गदर्शक, प्रशिक्षक, क्रीडा अधिकाऱ्यांसमोर नवा पेच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राज्यशासनाच्या क्रीडा युवक संचालनालयाने शालेय क्रीडा मोसमाचा अंतिम टप्पा सुरू असताना अचानक सहा खेळांच्या वयोगटांमध्ये वाढ केल्यामुळे ऐनवेळी नवीन खेळाडू आणायचे कोठून, असा पेच शारीरिक शिक्षक, क्रीडा मार्गदर्शक, प्रशिक्षक आणि क्रीडा अधिकाऱ्यांना पडला आहे. खेळाडू हे एका रात्रीतून घडत नसतात, याचा विसर क्रीडा धोरणाचा बागुलबुवा करणाऱ्या अन् खेळाडूंच्या भवितव्याशी खेळणाऱ्या शासनाला पडला असावा, अशी प्रखर टीका क्रीडा तज्ज्ञांनी केली आहे.

विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. शाळा तत्पूर्वीच प्रथमसत्र परीक्षा घेण्याच्या तयारीला लागल्या आहेत. विद्यार्थी खेळाडूही आता शालेय क्रीडा मोसम संपत आल्यामुळे अभ्यासाच्या तयारीला लागले आहेत. अशात वाढीव वयोगटासाठी खेळाडू शोधणे ही संबंधित सर्वांसाठीच तारेवरची कसरत असणार आहे.

परीक्षा जवळ आल्याने पाल्याने अभ्यासाकडे लक्ष द्यावे, अशी पालकांची इच्छा असते. त्यामुळे ऐनवेळी पाल्याला मैदानावर उतरण्याची परवानगी ते देतील की नाही, असा प्रश्न आहे. विभागीय स्पर्धा सुरू झाल्या असून, आठवडाभराने राज्यस्तरीय स्पर्धा सुरू होणार आहेत. त्यामुळे वाढीव वयोगटासाठी नव्याने स्पर्धा घ्यायची झाल्यास जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालयाला नव्याने कार्यक्रम आखणी करावी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आर्थिक भुर्दंड; लाभ नाही
आर्थिकभुर्दंड सहन करावा लागेल अन् फारसा लाभ मिळणार नाही. केवळ औपचारिकता पूर्ण करण्याकडे सर्वांचाच कल असेल कारण खेळण्याची खेळाडूंची, खेळवण्याची पालकांची, खेळाडू तयार करण्याची थकलेल्या प्रशिक्षक शारीरिक शिक्षकांची मानसिकताच उरणार नाही. संजयकथलकर, क्रीडाअधिकारी,

‘खेळ’खंडोबा होणार
आधीचकाही स्पर्धा पूर्ण झाल्या नाहीत, मध्येच वाढीव वयोगटाच्या स्पर्धा घेण्याची अतिरिक्त जबाबदारी खांद्यावर घेणे क्षमतेबाहेरील काम आहे. जमेल त्याला उभे करणे म्हणजे वेळ मारून नेणे होय. त्यामुळे, खेळाडूंसोबतच खेळाचेही नुकसान होईल. अनिलबोरवार, क्रीडाअधिकारी.
वाढीव वयोगटासाठी हवेत ३० ते ५० खेळाडू
सहावाढीव वयोगटाच्या स्पर्धा घेण्यासाठी मुले मुलींच्या गटात प्रत्येक खेळासाठी िकमान ३० ते ५० खेळाडूंची आवश्यकता असणार आहे. आधी ज्या खेळाडूंनी स्पर्धेत भाग घेतला, त्यांना या वेळी सहभागी होत येणार नाही. तर नव्या खेळाडूंची नोंदणीही अनिवार्य असणार आहे. कारण, एकदा एका वयोगटाकडून खेळलेले खेळाडू नव्याने समाविष्ट वयोगटाकडून खेळण्यास पात्र ठरणार नाहीत
वाढलेले वयोगट
बॉलबॅडमिंटन

आधी:१९ वर्षे मुले/मुली
वाढीव:१७ वर्षे मुले/मुली

कॅरम
आधी:१९वर्षे मुले/मुली
वाढीव:१७ वर्षे मुले/मुली

चॉयक्वांदो
आधी:१९वर्षे मुले/मुली
वाढीव:१७ वर्षे मुले/मुली

रोपस्किपिंग
आधी:१७ १९ वर्षे मुले/मुली
वाढीव:१४ वर्षे मुले/मुली

स्क्वॅश
आधी:१७ वर्षे मुले/मुली
वाढीव:१९ वर्षे मुले/मुली

थांग-ता
आधी:१९ १९ वर्षे मुले/मुली
वाढीव:१९वर्षे मुले/मुली