आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका पावसाने तुटतो त्यांचा शहराशी संपर्क

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- आजपासूनशाळेला प्रारंभ होणार आहे . पण शहरातील पुष्पक काॅलनीतील बालगृहात राहणाऱ्या मुलांना चिंता सतावतेय ती शाळेत जाण्याची. शहरातील बुधवारा ते अकोलीकडे जाणाऱ्या मार्गादरम्यान देसाई ले-आउट पुष्पक कॉलनी आहे. या मुख्य मार्गाचे मागील काही दिवसांपासून काम सुरू आहे.
या कामादरम्यान देसाई ले-आउट परिसरातील गोविंदा अपार्टमेंटसमोर रस्त्यावर महिनाभरा पासून मोठ-मोठे दगड टाकण्यात आले आहेत. जवळपास २०० मीटर हे दगड असल्यामुळे गोविंदा अपार्टमेंट तसेच पुष्पक कॉलनीमधील बालगृहातील मुलांना येणे-जाणे करण्यासाठी रस्ताच उरलेला नाही. त्यामुळे बालगृहातील मुलांना शाळेत पाठवायचे कसे, असा प्रश्न बालगृहातील अधिकाऱ्यांना सतावत आहे.
या रस्त्यामुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. पुष्पक कॉलनीमध्ये अगदी याच रस्त्याला लागून श्री संत अच्युत महाराज निराधार निराश्रित बालगृह आहे. या बालगृहात बाहेरगावची १०० मुलं राहतात. यामध्ये ते १८ वयोगटातील मुलांचा समावेश आहे. या मुलांना राहण्याची व्यवस्था बालगृहात असली तरी त्यांना शिक्षण घेण्यासाठी शाळेत जावे लागते. बालगृहातून बाहेर येणे-जाणे करण्यासाठी हाच मुख्य मार्ग आहे. अाता हाच मार्ग बंद झाल्याने मुलांना शाळेत पाठवायचे कसे, हा प्रश्न बालगृह प्रशासनाला सतावताेय.

उन्हाळ्यात शाळांना सुट्या असल्यामुळे बालगृहात मुलं नव्हती शाळेला सुरुवात हाेणार असल्याने बालगृहात मुले येण्यास सुरुवात झाली अाहे. अशीच परिस्थिती बालगृहासमोरच असलेल्या गोविंदा अपार्टमेंटमधील नागरिकांची आहे. या अपार्टमेंटमध्ये जवळपास ५० नागरिकांचे वास्तव्य आहे. उर्वरितपान

देसाई ले-आउट ते पुष्पक काॅलनी दरम्यानच्या मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गोविंदा अपार्टमेंट समोर टाकण्यात आलेल्या मोठमोठ्या दगडांमुळे नागरिकांच्या अावागमनाचा प्रश्न गंभीर बनला असून, अशा रस्त्यावरून मुलांना शाळेत पाठवायचे कसे, अशी चिंता येथील रहिवाशांना सतावत आहे
.
मुलांना शाळेत पाठवायचे कसे?
आमच्याबालकाश्रमात सुमारे १०० मुलं राहतात. शुक्रवारपासून मुलांना शाळेत पाठवण्यासाठी आम्ही वाहनांची व्यवस्था केली आहे मात्र वाहन बालकाश्रमापर्यंत येऊ शकत नाही, मुलांना शाळेत पाठवायचे कसे, हा गंभीर प्रश्न आहे. प्रियंकामुळे, अधीक्षक, श्री संत अच्युत महाराज निराधार निराश्रित बालकाश्रम, अमरावती.

संबंधितांच्या लक्षात आणून देतो
गडगडेश्वरते अकोली रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी बांधकाम साहित्य टाकण्यात आले आहे. देसाई लेआउटमधील नागरिकांची अडचण कदाचित यामुळेच झाली असेल. परंतु त्यांना पर्यायी रस्ता नसेल तर तेथे टाकण्यात आलेले दगड-धोंडे बाजूला सारुन रस्ता करुन द्यावा लागेल. तशी सूचना संबंधित अभियंत्यांना िदली जाईल. जीवनसदार, प्रभारी कार्यकारी अभियंता, मनपा. अमरावती.
बातम्या आणखी आहेत...