आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुठवर चालणार संप अन् कधी भेटतील पैसे देव जाणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- "काय सांगू बापराजा दुपारचं कडक उन्ह आंगावर घेत पन्नास रूपये भाडं खर्चून अमरावतीले बँकेत आली. पायतो तं काय बँक बंद आहे अन् कामं करणारे सारे लोकं भाईर बसेल हायत.. मले निराधाराचे सहाशे रूपये काढ्याचे होते.. जोळ पैसा नाही अन् या लोकाईचा संप सुरू हाय म्हंतात.. आता कदलोक याईचा संप चालन अन् कधी पैसे भेटतीन देव जाणे.'' हे शब्द आहेत भानखेडा खुर्द येथील चंफाबाई वरटी या ज्येष्ठ महिलेचे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून सहाशे रूपये काढण्यासाठी कडकडत्या उन्हात आलेल्या या आजीबाईला रिकाम्या हाताने परतावे लागले. बॅँकेच्या कर्मचारी संघटनेचा तीन दिवसांपासून सुरू असलेला संप केव्हा संपेल? पैसे काढण्यासाठी मला केव्हा येता येईल? ही दोन प्रश्न घेऊन चंफाबाई बँकेचा परिसर फिरल्या पण त्यांना धड उत्तर मिळालं, ना पैसे.

आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हा बँकेच्या सहाशे कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून, बुधवारी (दि. १३) संपाचा तिसरा दिवस होता. दररोज आपल्या कामकाजानिमित्त जिल्ह्यातील शेकडो नागरिक बँकेत येतात मात्र कर्मचाऱ्यां अभावी कार्यालये ओस पडली असल्याने रिकाम्या हाताने नागरिकांना परतावे लागत आहे. या संपाचा फटका जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूरांना बसत आहे. प्रलंबित महागाई भत्ते पुर्वलक्षी प्रभावाने देण्यात यावे, मय्यत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नियमित सेवेत सामावून घ्या, वार्षिक वेतनवाढ द्या आदी विविध मागण्यांसाठी कर्मचारी संपावर आहेत. बँक व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांच्या या भूमिकेचा सर्वसामान्यांना फटका बसत आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, बँकेने काय आवाहन केले...
बातम्या आणखी आहेत...