आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • District Council Chairman,latest News In Divya Marathi

जिल्‍हापरिषद सभापतिपदांवर काँग्रेस- राकॉंच्‍या ताब्‍यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- जिल्हापरिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्षपदावर वर्चस्व मिळवल्यानंतर काँग्रेस-राकाँने सभापतिपदांवरही ताबा मिळवला आहे. बुधवारी (दि. १) झालेल्या निवडणुकीत समाजकल्याण सभापतिपदी काँग्रेसच्या सरिता मकेश्वर, महिला बालकल्याण सभापतिपदी राकाँच्या वृषाली विघे, तर विषय समितीच्या सभापतिपदी काँग्रेसचे गिरीश कराळे अरुणा गोरले यांची वर्णी लागली.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणुकीत काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यानंतर विविध समितींच्या सभापतिपदांचा अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याने बुधवारी हात वर करून नवीन सभापतिपदांसाठी निवडणूक घेण्यात आली. निवडणूक प्रक्रियेला सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. समाजकल्याण सभापतिपदासाठी योगश्री चव्हाण, कृष्णराव पवार, सुधीर सूर्यवंशी, बाळकृष्ण साळुंखे, बापुराव गायकवाड, सरिता मकेश्वर, श्वेता वंजारी, प्रमोद वाकोडे या आठ उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते.सरिता मकेश्वर शिवसेनेचे सुधीर सूर्यवंशी वगळता इतर उमेदवारांनी नामांकन परत घेतले. त्यामुळे मकेश्वर सूर्यवंशी यांच्यात स्पर्धा होती. दोघांमध्ये झालेल्या निवडणुकीत मकेश्वर यांना ३३ मते, तर सूर्यवंशी यांना शून्य मते पडली. महिला बालकल्याण समितीच्या सभापतिपदासाठी ममता भांबुरकर, राजश्री श्रीराव, सुषमा कलाने, चित्रा डहाके, वृषाली विघे यांनी नामांकन दाखल केले होते. तीन सदस्यांनी नामांकन परत घेतल्याने जनसंग्रामच्या श्रीराव राकाँच्या विघे स्पर्धेत होत्या. दरम्यान, झालेल्या मतदानात िवघे यांना ३५ तर श्रीराव यांना दोन मते मिळाली. विशेष समितीच्या सभापतिपदासाठी गिरीष कराळे, अरुणा गोरले, महेंद्रसिंग गैलवार, जयप्रकाश पटले, सरिता मकेश्वर, प्रवीण मुदंडा, वृषाली िवघे सुधीर सूर्यवंशी यांनी नामांकन दाखल केले होते. चार सदस्यांनी नामांकन परत घेतल्याने काँग्रेसचे िगरीश कराळे, अरुणा गोरले, भाजपचे जयप्रकाश पटेल प्रहारचे प्रवीण मुदंडा यांच्यात चुरस होती. गिरीष कराळे अरुणा गोरले यांना प्रत्येकी ३३ मते, तर पटेल मुदंडा यांना शून्य मते पडली.
काँग्रेसकडे एकहाती सत्ता
मागीलवेळी राकाँच्या सुरेखा ठाकरे यांनी भाजप, शिवसेना इतर घटक पक्षांच्या मदतीने काँग्रेसकडे सर्वािधक सदस्य असताना सत्ता स्थापन केली होती. अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही असाच काहीतरी चमत्कार होईल, अशी उत्सुकता सर्वांना होती. परंतु ऐनवेळी िनवडणूक अविरोध होऊन अध्यक्षपदी काँग्रेसच्या सदस्यांची निवड करण्यात आली होती. परंतु िनवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभापतिपदासाठी चुरशीचे राजकारण होईल, अशी शक्यता व्यक्त होत होती. परंतु अध्यक्षपदासारखीच ही निवडणूक झाल्याने इतरांचा भ्रमनिरास झाला. अध्यक्ष-उपाध्यक्षपद िमळवल्यानंतर सभापतिपदांवरही ताबा मिळवल्यानंतर एकहाती सत्ता असल्यामुळे आता नवनिवार्चित अध्यक्ष सभापती आगामी काळात िजल्ह्याच्या विकासाला गती आणू शकतील काय, याबाबत उत्सुकता िनर्माण झाली आहे.