आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायव्यवस्था ‘त्यांच्या’ पाठीशी आहे, जिल्हा न्यायाधीश आणेकर यांचे प्रतिपादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - ‘समाजातील प्रत्येक व्यक्तीला अपंगांविषयी सहानुभूती असलीच पाहिजे. त्यांच्यासोबत सेवाभावाची भावनाही असावी. अपंग व्यक्तीसुद्धा समाज व्यवस्थेचाच घटक आहे. अपंग व्यक्तींनीही नैराश्य व न्यूनगंड झटकायला हवा. या दोन गोष्टी व्यक्तींच्या विकास व प्रगतीमध्ये मुख्य अडसर आहेत. अपंग व्यक्तींच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी न्यायव्यवस्था सक्षमपणे त्यांच्या पाठीशी उभी आहे,’ असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश एस. एल. आणेकर यांनी केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व अपंग जीवन विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अपंग व्यक्तीचे अधिकार’ या विषयावर कायदेविषयक मार्गदश्रन शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. वडाळी कॅम्प येथील राजीव गांधी डी.एड. कॉलेज फॉर स्पेशल एज्युकेशन येथे पार पडलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अपंगांना अपंग म्हणून नव्हे, तर फिजिकली चॅलेंज म्हणून स्वीकारण्याचे आवाहन आणेकर यांनी केले.

किशोर बोरकर कार्यक्रमाचे आयोजक होते. कार्यक्रमाला साहेबराव घोगरे, मंगेश आठवले, प्रा. प्रमोद दानखेडे, राजू कोंडे, अपंग विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते. जिल्हा व सत्र न्यायाधीश कार्यालयाचे अजय कडू यांनी सूत्रसंचालन, तर प्राचार्य अतुल जाधव यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

यांचे लाभले मार्गदर्शन
या प्रसंगी दिवाणी न्यायाधीश एस. एन. माने यांनी अपंग व्यक्तींच्या समान अधिकाराविषयी कायद्याची विस्तृत माहिती दिली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव ओ. बी. वर्मा यांनी अपंग व्यक्तींविषयी कायद्याची आवश्यकता व शासनाचे सकारात्मक धोरण स्पष्ट केले.