आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा शल्यचिकित्सकांची खुर्ची जप्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- न्यायालयाच्या जप्ती आदेशान्वये जिल्हा सामान्य रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रघुनाथ भोये यांची खुर्ची मंगळवारी जप्त करण्यात आली. 2007 मध्ये नांदगाव खंडेश्वर येथील रुग्णवाहिकेने दुचाकीने जाणारे राजापेठ येथील रहिवासी समीर पाटील यांना राजकमल चौकात धडक दिली होती. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. आपल्याला नुकसानभरपाई मिळावी, यासाठी पाटील यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.

रुग्णवाहिकेचा विमा नसल्याचे या प्रकरणाच्या तपासात आढळून आले. मे 2013 मध्ये न्यायालयाने समीर पाटील यांना एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रघुनाथ भोये यांना दिले होते. मात्र, नुकसानभरपाई न मिळाल्याने मंगळवारी जिल्हा शल्यचिकित्सकांची खुर्ची ताब्यात घेण्यात आली. या प्रसंगी परिसरात बघ्यांची गर्दी झाली होती.