अमरावती- जिल्ह्यातील अंत्योदय, बी.पी.एल आणि ए.पी.एल रेशन कार्डधारकांना ऑक्टोबर व नोव्हेंबर 2013 चे धान्य अद्याप वितरित झाले नाही. या मुद्दय़ावर भारतीय जनता पार्टीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे शिदोरी आंदोलन केले. पदाधिकार्यांनी अप्पर जिल्हाधिकारी किशोर कामुने आणि अन्न-धान्य वितरण अधिकारी प्रकाश देशपांडे यांना शिदोरी आणि निवेदन दिले. लाभार्थ्यांनी ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यातील धान्य मिळत नसल्याबाबत शासनाला वारंवार निवेदन दिले होते. यासंदर्भात चौकशी समिती नेमून आठ दिवसांत अहवाल दिला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्याकडून मिळाले होते.
तथापि, आठ महिने लोटल्यानंतरही अहवाल तयार करण्यात आला नाही वा चौकशीही झाली नाही. अन्न सुरक्षा विधेयक लागू झाल्यापासून ज्या कार्डधारकांना धान्य मिळाले नाही, त्यांना त्वरित वाटप करावे. ज्यांच्याकडे कार्ड नाही अशांना शिबिराच्या माध्यमातून कार्ड उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
सध्या आदिवासी आर्शमशाळेला रेशन कार्डवर मिळणारे धान्य बंद झाले. मूकबधिर, अंध-अपंग शाळांचीही तीच अवस्था आहे. जिल्ह्यातील वितरण व्यवस्था मोडकळीस आली आहे. या प्रकाराला जबाबदार कोण, असा प्रo्न उपस्थित करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी पदाधिकार्यांनी केली आहे. या वेळी जिल्हाधिकारी उपस्थित नसल्याने आश्वासन देऊ शकत नसल्याचे तसेच कार्डधारकांच्या समस्यांची चौकशी करण्याचे आश्वासन किशोर कामुने यांनी दिले.
शिदोरी आंदोलनाला भाजप शहर ध्यक्ष तुषार भारतीय, माजी महापौर किरण महल्ले, नगरसेवक संजय अग्रवाल, सुरेखा लुंगारे, प्रा. संजय तीरथकर, अविनाश चुटके, राधा कुरील, वनमाला सोनोने, गंगा खारपे, मंदा सूर्यवंशी, राहुल बलखंडे, सरचिटणीस चेतन गावंडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व कार्डधारकांची उपस्थिती होती. दोन ते तीन दिवसांत जिल्हाधिकार्यांसोबत भाजपाच्या पदाधिकार्यांची याच विषयावर बैठक होणार असल्याची माहिती सरचिटणीस चेतन गावंडे यांनी दिली आहे.