आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्यात 30 पासून ‘दिव्य एज्युकेशन, करिअर फेअर’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- इयत्ता दहावी, बारावी, पदवीसह सर्वच परीक्षा आटोपल्या, आता निकालांची प्रतीक्षा आहे. निकालानंतर पुढील प्रवेश आणि योग्य करिअरची निवड हा विद्यार्थ्यांसमोरील यक्ष प्रश्न आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी दैनिक भास्कर समूहाच्या दैनिक दिव्य मराठीने पुढाकार घेतला आहे.
शुक्रवारी दि. 30 मे ते रविवार 1 जूनदरम्यान अकोला येथे ‘दिव्य एज्युकेशन अँड करिअर फेअर 2014’ चे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी शालांत, उच्च माध्यमिक परीक्षा आटोपल्यानंतर मुलांना प्रश्न पडतो की, पुढील प्रवेश कोणत्या शाखेत व कोणत्या संस्थेत घ्यावा, त्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज असते. मात्र, हे मार्गदर्शन एकाच छताखाली सहज उपलब्ध होत नाही. विद्यार्थ्यांची ही गरज ओळखून एकाच छताखाली उपलब्ध असलेल्या विविध शाखांविषयीची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी, म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला.
अकोला येथील रतनलाल प्लॉटमधील चौधरी महाविद्यालयाच्या प्रांगणात 30 मे ते एक जूनदरम्यान, हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. एज्युकेशन फेअरमध्ये नामवंत शैक्षणिक संस्थांसह पुणे, नागपूर, नाशिक, वर्धा, जळगाव, यवतमाळ औरंगाबाद, अमरावती, बुलडाणा आदी ठिकाणांच्या संस्थांचा सहभाग राहील. यामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय शाखांसह प्रवेशाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
स्टॉलची नोंदणी करा : स्टॉलच्या नोंदणीसाठी दैनिक दिव्य मराठीच्या कार्यालयाशी संपर्क साधून स्टॉलची बुकिंग करून घ्यावी. या फेअरमध्ये विद्यापीठ, व्यावसायिक अभ्यासक्रम, शिकवणी वर्ग व संस्था, निवासी शाळा, शिक्षण साहित्य क्षेत्रातील विक्रेते, प्रकाशक सहभागी होऊ शकतील. स्टॉल बुकिंगसाठी कार्यक्रमाचे उपक्रम प्रमुख विठ्ठल काकडे (8390045156), दिनेश ठोकळ (8390903807), प्रवीण हटकर (8390903817), विक्रम मदने, बुलडाणा (8390044958), पीयूष गावंडे, अमरावती व यवतमाळ (8550997231), रितूराज पांडे, अमरावती (8411969048) यांच्याशी किंवा अमरावती येथील दैनिक दिव्य मराठीच्या जे. अँड डी. मॉल, तिसरा मजला येथील कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.