आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेवकांच्या सुनावणीला आता नववर्षाचा ‘मुहूर्त’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- पक्षसोडला म्हणून सदस्यत्व रद्द केले जावे, या मागणीसाठी विभागीय आयुक्तांच्या दालनात पोहोचलेल्या राकाँला आता प्रशासकीय झटका बसला आहे. दुसरीकडे, प्रशासनाने या प्रकरणात थेट नवीन वर्षाची तारीख दिल्यामुळे नगरसेवकत्व गमावण्याची भीती असलेल्या नगरसेवकांना मात्र तोपर्यंत ताणमुक्त कामकाजाची संधी प्राप्त झाली आहे.
लोकसभा िनवडणुकीचा उमेदवार ठरवताना िवश्वासात घेतले नाही म्हणून राकाँचे प्रदेश महासचिव संजय खोडके माजी आमदार सुलभा खोडके यांनी पक्ष सोडून वऱ्हाड िवचार मंचची स्थापना केली होती. या घडामोडीत राकाँ फ्रंटचे तत्कालीन गटनेते अविनाश मार्डीकर यांच्यासह िमलिंद बांबल, िरना नंदा, चेतन पवार, जावेद मेमन, जयश्री मोरे अशा सर्वच नगरसेवकांनीही राकाँ सोडून वऱ्हाड िवचार मंचचा मार्ग िनवडला होता.
कालांतराने त्यातील काही जणांनी सुनील काळे यांच्या नेतृत्वात एकत्र येऊन परत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहण्याचा िनर्णय घेतला. तेव्हापासून राकाँ विरुद्ध मंच असा (आता ते सगळे मंचवासी नगरसेवक काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत.) वाद उफाळून आला आहे. या पार्श्वभूमीवर राकाँच्या ितकिटावर िनवडणूक िजंकून राकाँलाच िवरोध करणाऱ्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी राकाँचे गटनेते सुनील काळे यांनी केली आहे.
नेमक्या याच मुद्द्यावर त्यांनी िवभागीय आयुक्तांच्या दालनात याचिका दाखल केली आहे. मध्यंतरीच्या काळात महापालिकेत स्थायी समिती सभापती महापौर-उपमहापौरांची िनवडणूक झाली.

यानिवडणुकीच्या वेळी गटनेते म्हणून सुनील काळे यांनी व्हीप जारी केला होता; परंतु मार्डीकर यांच्यासोबत काम करणाऱ्या नगरसेवकांनी तो अमान्य केला. त्यामुळे त्या सर्व सदस्यांचे नगरसेवकत्व रद्द करावे, अशी मागणी काळे यांनी दाखल केलेल्या याचिकेतून करण्यात आली आहे.