आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्ञानेश्वरीतील सिद्धांत रेखाटणार मंदिराच्या भितींवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- अध्यात्मिकउपासकांसाठी पर्वणी ठरेल असे देखणे अन् भव्य ज्ञानेश्वर माऊलींचे मंदिर भातकुली तालुक्यातील श्री क्षेत्र सोनारखेड येथे उभारले जात असून बांधकामालाही सुरुवात झाली आहे. आज संपूर्ण जगाला ज्याची प्रत्यक्ष अनुभूती येत आहे, असे ज्ञानेश्वरीतील सिद्धांत सचित्र भिंतीवर रेखाटले जाणार आहेत. भातकुली तालुक्यातील वाठोडा शु. ते म्हैसपूर रोडवर पूर्णा नदीच्या (पायोष्णी) काठावर सोनारखेड हे गांव असून तेथेच अध्यात्म ज्ञानपीठाची स्थापना करण्यात आली आहे.

ज्ञान दानाच्या पवित्र हेतूने गुरुवर्य दास ज्ञानेश्वर यांनी सोनारखेड येथे ज्या ठिकाणी गुप्त सिद्धेश्वर आणि नंदीची मूर्ती सापडली त्याच ठिकाणी रस्त्याच्या पश्चिमेस कोणाला एकही पैसा मागता स्वखर्चे २० गुंठे जागा विकत घेऊन २०१५ मध्ये श्री दास ज्ञानेश्वर अध्यात्म पिठाची स्थापना केली. त्यानंतर सार्वजनिक विश्वस्त नेमून स्वत:ची ही जागा दान केली.
जेणे गीता उपदेशिली ती विटेवर माऊली।। तोची अवतार धरी अलंकापुरी। ज्ञानाबाई सुंदरी तारावया।। शिवपीठ हे जुनाट। ज्ञानाबाई तेथे मुकुट ।। असे आळंदी येथील समाधी स्थळाचे वर्णन करताना संत एकनाथ महाराज यांनी म्हणाले होते.
सोनारखेड येथील मंदिर बघितल्यानंतर या अभंगातील ओळींचा प्रत्यय यावा, अशी विश्वस्त मंडळाची इच्छा असून त्या दृष्टीने कामही सुरू आहे. यासाठी स्वेच्छेने मदत करायची असल्यास त्यांनी विश्वस्त मंडळाशी संपर्क साधून या चांगल्या कामी हातभार लावावा,असे आवाहनही विश्वस्त मंडळाने केले आहे.
बांधकामाला सुरुवात
असे साकारणार मंदिर
वृक्षारोपण गरीब विद्यार्थ्यांना मदत : परिसरातवृक्षारोपणाचे महत्त्व पटवून त्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करण्यासोबतच शिक्षणात हुशार असलेल्या गरीब विद्यार्थ्यांना शक्य असेल तेवढी मदतही दास ज्ञानेश्वर वारकरी ट्रस्टद्वारे केली जाते. संत संमेलन, सामुदायिक सामाजिक सेवा, अन्न, जल औषधीचे वाटप करण्यात धार्मिक जागृती करण्याचे महत्त्वपूर्ण कामही हे मंडळ करीत आहे.

व्यसनमुक्ती, वाचन चळवळ उभारणार
युवकांनीव्यसनांपासून दूर राहावे, बालमनावर चांगले संस्कार करणे, बालपणापासूनच वाचनाची आवड निर्माण करण्यासोबतच आध्यात्मिक ज्ञान कीर्तन, भजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचे कार्य दास ज्ञानेश्वर वैष्णव वारकरी ट्रस्ट सोनारखेड करीत आहे. वारकरी दिंडी पालखी सोहळ्याद्वारे आध्यात्मिक समाज जागृतीचे कार्यही त्यांनी हाती घेतले आहे. संतांच्या उपदेशानुसार अंधश्रद्ध निर्मूलनाचे महत्त्वपूर्ण कार्य या संस्थानातर्फे नियमितपणे केले जात असते, अशी माहिती विश्वस्त पांडुरंग डोंबाडे यांनी दिली .
दिव्य मराठी विशेष
बातम्या आणखी आहेत...