आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डीएलएड करा; पण नोकरीची हमी नाही!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - प्राथमिक शिक्षण पदविका (डीएलएड) करा; मात्र नोकरी मिळेलच याची खात्री नाही, असे दस्तुरखुद्द महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेनेच कबूल केले आहे. प्रथम वर्ष डीएलएड प्रवेशासाठी जूनपासून अर्ज विक्री सुरू होणार आहे. याबाबत प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीतून परिषदेने ही बाब अधोरेखित केली आहे.
प्राथमिक शिक्षण पदविका (डी.एड.) अभ्यासक्रम केल्यानंतर शिक्षकाची नोकरी मिळेलच, ही परिस्थिती आता पूर्णपणे बदलली आहे. पूर्वी डी.एड. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्राथमिक शिक्षकाची नाेकरी हमखास मिळत होती. शिवाय मागील दहा ते १५ वर्षांपूर्वी डी.एड. करणारा एकही उमेदवार बेकार राहत नव्हता. काही वर्षांत अध्यापक विद्यालये खिरापतीसारखे वाटण्यात आल्याने शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांची फौज निर्माण झाली. शिवाय मे २०१० नंतर महाराष्ट्रात शिक्षक भरती परीक्षा (सीईटी) देखील झाली नाही. पाच वर्षांत या अध्यापक विद्यालयातून प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांची संख्यादेखील झपाट्याने वाढत गेली. एका वर्षात लाखो विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण करीत असताना शासनाने नोकर भरतीवर बंदी घातली. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर नोकरी मिळेल तरी कशी, अशी स्थिती निर्माण झाली.
मागील वर्षी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेनंतर हे वास्तव समोर आले. गुणवत्तेच्या आधारे पूर्वी या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळत होता. मात्र, खासगी विद्यालयांना मान्यता दिल्याने केवळ पैशांच्या जोरावर अभ्यासक्रम पूर्ण करता येणे शक्य झाले. त्यामुळे गुणवत्तेची पात्रता नसताना अनेकजणदेखील लक्ष्मीदर्शनातून सरस्वतीच्या मंदिरात दाखल झाले, तर असंख्य प्रयत्नात आहेत. गुणवत्तेवर आधारित क्षेत्रदेखील आता धनिकांच्या हातचे बाहुले झालेत. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेवर प्रवेशाच्या जाहिरातीतून अशी माहिती देण्याची वेळ आली.
लाखो उमेदवारांना नोकरीची प्रतीक्षा
राज्यातमे २०१० नंतर शिक्षक भरती परीक्षा (सीईटी) झाली नाही. २०१३ मध्ये पाच लाख ९१, ९९० उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा िदली होती. २०१४ च्या शिक्षक पात्रता परीक्षेत हा आकडा तीन लाख ८८, ६९९ वर आला. ही संख्या पाहता राज्यात लाखो उमेदवार शिक्षकाची नोकरी मिळवण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
बातम्या आणखी आहेत...