आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनाचे भविष्य सांगता येत नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती एकहीवर्ग शिकलेल्या संत गाडगे बाबांनी आपल्याला तर्कशुद्ध बुद्धी कशी वापरावी ,विवेकवाद, वैज्ञानिक दृष्टीकोण कसा वापरावा हे शिकवले. तरीही आपण सर्व शिकलो सवरलेले असूनही अंधश्रद्धेवर श्वास ठेवतो. आपल्या जीवनाचे भविष्य कुणाला सांगता येत नाही.
ज्योतिष्यांनी अंदाजे मारलेले टोले खरे निघतात. तेव्हा आपण बोंबाबोंब करतो.त्यामुळे कोणीही अंधश्रद्धांचा बळी पडता कामा नये,असे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी केले.
रविवारी (दि. २८) संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात अायोजित रोटरी क्लब ऑफ अमरावती मिडटाउनच्या पदग्रहण समारंभात ‘बुवा-बाबा फलजोितष्य किती खरे? किती खोटे ?’ या विषयावर ते बोलत होते.

जे जे बाबा आहेत त्यांना आपण संत म्हणतो. देशात गावोगावी पसरलेले बाबा स्वत:ला महाराज म्हणवतात लोकांची बनवेगीरी करतात. यांच्यात प्रचंड सामर्थ्य अाहे अशी आपलीही समजूत असते. मात्र ही आपली पूर्णता बनवेगीरी असते, असे ते म्हणाले. भोंदूगीरीची विविध उदाहरणे त्यांनी दिली.

नवसासारख्या कल्पना मोडित काढणाऱ्या गाडगेमहाराजांना नवस बोलणारी एक महिला मी गाडगेनगरातील मंदिरात पाहिली नि मला शॉक बसला असा त्यांनी स्वत: अनुभवलेला प्रसंग कथन केला.

अगरबत्ती कशी फिरते, सोन्याची अंगठी, चैन, दहा रूपयाचे नाणे हवेत हात फिरवल्यावर कशी तयार केली जाते. रसायनांव्दारे अग्नी कशी निर्माण करता येऊ शकते अशा बुवाबाबीच्या कुप्त्यांची त्यांनी प्रेक्षकांसमोर उकल केली.

यावेळी रोटरी क्लब आॅफ मिडटाऊनचे सुभाष यादव, राजेश खंडेलवाल, विनायक कडू, राजेश बुब, विशेष अतिथी प्रवीण चापोरकर आदींची उपस्थित होती.
तोपर्यंत नाहीत अच्छे दिन

समाजजोपर्यंत अंधश्रद्धेतून निघणार नाही तोपर्यंत अच्छे दिन येणार नाहीत. त्यामुळे बुवा बाजीच्या पाठीमागे लागू नका असे आवाहन प्रमुख अतिथी किशोर केडिया यांनी यावेळी केले.
दिव्य मराठी विशेष
बातम्या आणखी आहेत...