आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाॅक्टरच्या घरातून १० लुटले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- भरदिवसा गद्रे चौकातील मुख्य रस्त्यावर असलेल्या एका डॉक्टरच्या घरात शिरून अज्ञात लुटारूने शयनकक्षात झोपलेल्या डॉक्टरला उठवून, कोणत्या तरी शस्त्राचा धाक दाखवून तब्बल १० लाख रुपये लुटल्याची घटना रविवारी सकाळी वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात लुटारूविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. डॉ. राजेंद्र गोपीकिसन कलंत्री (५५ रा. गद्रे चौक) असे डॉक्टरांचे नाव आहे.
डॉ. कलंत्री यांचे अमरावती - बडनेरा या मुख्य मार्गावर घर आहे. डॉ. कलंत्री यांनी मागील दहा वर्षांपासून डॉक्टरी व्यवसाय बंद केला असून, ते सध्या प्रॉपर्टीचा व्यवसाय करतात. रविवारी सकाळी वाजताच्या सुमारास डॉ. कलंत्री घरातील त्यांच्या शयनकक्षात झोपले होते. त्या वेळी तोंडाला रुमाल बांधून एक व्यक्ती त्यांच्या घरात आला. या वेळी डॉ. कलंत्रीच्या पत्नी पाणी भरत होत्या. लुटारूने त्यांची नजर चुकवून थेट डॉक्टर झोपले होते, त्या खोलीत प्रवेश केला
. या वेळी लुटारूने त्यांना झोपेतून उठवून एक वस्तू डोक्याला लावली. ती वस्तू रिव्हॉल्व्हर होती किंवा नाही हेसुद्धा त्या वेळी मी पाहू शकलो नाही, असे डॉक्टरने सांगितले. मात्र, त्या वस्तूचा धाक दाखवून लुटारूने घरात असलेला ऐवज देण्याची मागणी केली. जर रक्कम दिली नाही तर भरचौकात मारून टाकणार, पत्नीला मारणार तसेच पोलिसांना सांगितल्यास वाईट होईल, अशा धमक्या दिल्या. या वेळी त्याच खोलीत एका बॅगमध्ये असलेले दहा लाख रुपये डॉ. कलंत्रीने त्या लुटारूला त्याच्याकडील पिशवीत टाकून दिले. रक्कम घेतल्यानंतर लुटारूने डॉक्टरचे हात बांधण्याचे प्रयत्न केले, मात्र हात बांधताच १० लाख रुपयांची रक्कम घेऊन हा लुटारू घरातून बाहेर पडला.
या वेळी डॉ. कलंत्री यांच्या पत्नीने त्या व्यक्तीला बाहेर निघताना पाहिले. त्यांनी हटकले असता तो पायदळच निघून गेला. डॉ. कलंत्रीच्या घरापासून जवळपास १०० मीटर अंतरावर असलेल्या एका गल्लीतून तो लुटारू रक्कम घेऊन गेला. या प्रकारानंतर डॉ. कलंत्री यांनी त्यांच्या नातेवाइकांना, मित्रांना राजापेठ
गुन्हा दाखल, अज्ञात लुटारूचा तपास सुरू
डॉ.कलंत्रींच्या तक्रारीवरून याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. लुटारूने शस्त्र वापरले की नाही, ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. आमचा तपास सुरू आहे. मिलिंद पाटील, प्रभारी सहा.पोलिस आयुक्त.

मालीश करणाऱ्यावर व्यक्त केला संशय
डॉ.कलंत्री वर्षातून सहा ते सात वेळा मालीश करून घेतात. यासाठी ते मालीश करणाऱ्यांना बोलवत असतात. पंधरा दिवसांपूर्वी एक व्यक्ती त्यांच्या घरात आला. मी मालीश करणारा असून, यापूर्वी तुमची मालीश करण्यासाठी आलो होते, असे त्याने डॉ. कलंत्री यांना सांगितले होते. तो संशयित लुटारू असावा, असे डॉ. कलंत्री सांगत होते.
डॉ. राजेंद्र कलंत्री यांच्या घरी झालेल्या चोरीचा पंचनामा करताना पोलिस अधिकारी.