आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच मी माझा 'विजय' गमावला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मुंबई येथील रहिवासी ‘पीडीएमसी’मध्ये इंटर्नशिप करणाऱ्या डॉ. विजय मिश्रा यांचा २४ मार्चच्या पहाटे रुग्णालयात मृत्यू झाला. डॉ. विजयला योग्य आणि वेळेवर उपचार मिळाले नाहीत, त्याच्या उपचारादरम्यान डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला, असा आरोप डॉ. विजयचे वडील अमरजित मिश्रा यांनी केला आहे. या प्रकरणी मिश्रा यांनी शनिवारी (दि. २५) प्रभारी पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली.
डॉ. विजय मिश्रा यांचे एमबीबीएस पूर्ण झाले होते. ते पीडीएमसीमध्येच इंटर्नशिप करत होते. २४ मार्चला पहाटे डॉ. विजय यांना त्यांच्या मित्रांनी पीडीएमसीमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान डॉ. विजयचा मृत्यू झाला. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे त्या वेळी महाविद्यालयाकडून सांगण्यात आले होते. एकुलता एक डॉक्टर मुलगा अकस्मातपणे गेल्यामुळे मिश्रा कुटुंबीयांना धक्का बसला अाहे. त्यावेळी डॉ. विजय यांचे वडील अमरजित मिश्रा यांना पीडीएमसीमधील डॉक्टरांनी सांगितले, की मृतदेह घेऊन जा, शवविच्छेदन करण्याची गरज नाही. अशा अवस्थेत मिश्रा यांनी पोलिसांबद्दल काही तक्रार केली नाही. मात्र, २५ एप्रिलला अमरजित मिश्रा यांच्यासह डॉ. विजयचे काही नातेवाईक पोलिस आयुक्तालयात आले. डॉ. विजयचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला त्यांच्या मृत्यूमागे वेगळे कारण असल्याचा आरोप अमरजित मिश्रा यांनी केला आहे. या प्रकरणी गाडगेनगरचे ठाणेदार कैलाश पुंडकर यांनी मिश्रा यांची तक्रार दाखल करून घेतली आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप करण्यात आला असल्यामुळे या प्रकरणाचा वैद्यकीय तपास जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती करते. पोलिस या प्रकरणाची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांना देणार आहेत. त्यानंतर ही समिती या प्रकरणात तपास करणार आहे. अहवालात डॉक्टरांचा दोष असल्याचा ठपका ठेवला, तर पोलिस डॉ. विजय यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांविरुद्ध कलम ३०४ अन्वये गुन्हा दाखल करू शकतात.

चाैकशी अहवालानंतर दाेषींवर कारवाई
अमरजितमिश्रा यांनी तक्रार दिली असून, डॉक्टरांनी योग्य उपचार केल्याचा आरोप केला आहे. अशा प्रकरणांचा तपास जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती करते. त्यामुळे आम्ही जिल्हा शल्य चिकित्सकांना कळवणार आहोत. चौकशीअंती दोषी आढळणाऱ्याविरुद्ध ३०४ अन्वये गुन्हा दाखल होऊ शकतो. सोमनाथघार्गे, प्रभारीपोलिस आयुक्त.

आम्ही ३५ लाख फी दिली, तर साडेसतरा हजारही दिलेच असते
डॉ.विजय यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांचे मित्र औषध घेण्यासाठी मेडिकलमध्ये गेले. तेथे साडेसतरा हजारांची औषधी देण्यावरून त्रास झाला. मुलाच्या शिक्षणासाठी आम्ही ३५ लाख रुपये फी भरली आहे. अशावेळी मेडिकलचे साडेसतरा हजार रुपये दिलेच असते. मात्र, खूप वेळानंतर मेडिकलवाल्याने औषधं दिलीत. आमच्या मुलाच्या मृत्यूमागे काहीतरी वेगळे कारण आहे. पोलिसांनी त्याचा तपास करावा. अमरजितमिश्रा, डॉ.विजययांचे वडील.