आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात ‘डॉग इटर’ कुत्र्याच्या पिल्लास दगडाने ठेचून ठार करत त्याचे खाल्ले मांस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरातसध्या एका ‘डॉग इटर’ची प्रचंड दहशत आहे. जिवंत कुत्रे, कुत्र्याची पिल्ले इतकेच काय, एखादा वराह मारून या वेड्या व्यक्तीने खाल्ल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मराठा कॉलनी परिसरातील नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी या माथेफिरूला ताब्यात घेऊन सोडून दिले.
गोपालनगर भागात असलेल्या मराठा कॉलनी परिसरात दोन दिवसांपासून एक माथेफिरू फिरत होता. सुरुवातीला नागरिकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. परंतु त्याने शनिवारी एक वराह आणि एक कुत्रे मारून खाल्ल्याचा प्रकार काही नागरिकांच्या निदर्शनास आला. यानंतर परिसरातील नागरिकांचे अक्षरश: धाबे दणाणले. हा किळसवाणा प्रकार करणाऱ्या माथेिफरूविषयीची माहिती नागरिकांनी पोलिसांना कळवली.
कुत्र्याच्यापिल्लाचा घेतला बळी :या माथेफिरूने शनिवारी एका वराहाचे कच्चे मांस खाल्ल्यानंतर परिसरातील एक कुत्र्याचे पिल्लू त्याने पकडले. यानंतर त्याने या पिलाला दगडाने ठेचून ठार केले त्याचाही फडशा पाडला. परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती त्वरित पोलिसांना दिली.
माथेफिरूला ताब्यात घेऊ
मराठाकॉलनी परिसरात एक व्यक्ती प्राण्यांचे मांस खात असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी कळवली होती. यानंतर या व्यक्तीला ताब्यात घेऊन सोडण्यात आले होते. घटनेचे गांभीर्य पाहता ही व्यक्ती नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकते. पुढील कोणताही अनर्थ टाळण्यासाठी आम्ही संबंधित व्यक्तीला पुन्हा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पोलिसांचे पथक कार्यरत झाले आहे. शिवाभगत, ठाणेदार,राजापेठ पोलिस ठाणे.
व्यक्ती घातक ठरू शकते
आमच्यापरिसरात एक व्यक्ती दोन दिवसांपासून दिसत होता. त्याने शुक्रवारीसुद्धा एका मृत प्राण्याचे मांस खाल्ल्याची चर्चा होती. शनिवारी मात्र त्याने पुन्हा एका कुत्र्याला खाल्ल्याचे ऐकायला आले म्हणून आम्ही त्याचा शोध घेत होती. ही व्यक्ती घातक ठरू शकतो.
कुलदीपश्रीवास, रहिवासी,मराठा कॉलनी.

हा तर विक्षिप्त मन:स्थितीचा प्रकार आहे. जर एक व्यक्ती अशा प्रकारचे कृत्य करतो, तर नक्कीच ही विक्षिप्त मन:स्थिती आहे. इतक्या मनोविकृत स्तरावर जाऊन जर कुणी आयुष्य जगत असेल, तर ही बाब गांभीर्याने घेण्यासारखी आहे. काही वर्षांपूर्वी एका गावात अशा स्वरुपाची एक नव्हे, तर अनेक लोकं आढळली होती. मग त्यांच्यात सुधारासाठी प्रयत्नही केला गेला. मात्र, त्या प्रयत्नात सातत्य नव्हते. या व्यक्तीचा शोध घेऊन त्याचा बंदोबस्त करायला हवा. पंकजवसाडकर, क्लिनिकलसायकोलॉजिस्ट.