आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्वानांची दहशत; 188 जणांचा घेतलाय चावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरात मोकाट श्वानांची दहशत कायम असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दोन आठवड्यांत 188 जणांना श्वानांनी चावा घेतल्याची धक्कादायक माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातून मिळाली आहे. महापालिकेने मोकाट श्वानांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी सातत्याने पुढे येत आहे.
श्वानांच्या दहशतीमुळे शहरातील विविध परिसरांत नागरिकांना रात्रीचे फिरणे त्रासदायक ठरत आहे. अनेक अपघातांनादेखील मोकाट श्वानच कारणीभूत ठरत आहेत. दोन ते आठ जून या आठवड्यात 90, तर नऊ ते पंधरा जून या आठवड्यात 98 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातून मिळाली आहे. खासगी मालकीच्या श्वानांमुळे जर उपद्रव निर्माण होत असेल, तर त्यासंबंधीची नोटीस संबंधित मालकाला दिली जाते. मालकीचा श्वान बाहेर फिरत असेल, तर मालकाने विशेष दक्षता घ्यायला हवी. मोकाट श्वानांच्या बंदोबस्ताची कारवाई नियमितरीत्या सुरूच आहे. नागरिकांच्या तक्रारीनुसार कारवाई करण्यात येते. विविध परिसरांत मोकाट श्वानांना पकडण्याची मोहीम महापालिकेकडून राबवण्यात येत आहे. नियमांचे पालन करून लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
रस्त्यावर असते श्वानांचेच राज्य
रात्री घरी जाताना रस्त्यावर श्वानांचेच राज्य असते. अशा वेळी एक तर दुसरा रस्ता पकडावा लागतो, किंवा कुणाची मदत तरी घ्यावी लागते. त्यांच्या चावा घेण्याच्या प्रमाणामध्येही वाढ झाली आहे. त्याचा मनस्ताप झेलावा लागतो. महापालिकेने मोकाट श्वानांविरोधात कारवाई करावी. सिद्धेश्वर गायकवाड, नागरिक पशुशल्यचिकित्सक
श्वान पाळण्यासाठी ‘ना-हरकत’ घ्यावी
खासगी मालकीच्या श्वानांचे ना-हरकत प्रमाणपत्र संबंधित मालकांनी महापालिकेतून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी नियमानुसार श्वान पाळावा; म्हणजे कारवाई करणे अधिक सोपे होईल. सार्वजनिक सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी श्वानमालकाने सहकार्य करावे. डॉ. एस. एस. गावंडे,