आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shegov Sanstha Get Donation In The Name Of Barack Obama And Modi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बराक ओबामा, नरेंद्र मोदींच्या नावाने शेगाव संस्थानला मिळाले दान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अमेरिकेचेराष्ट्राध्यक्ष बराक ओबामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने प्रत्येकी एकशेएक रुपयाची देणगी एका भाविकाने शेगांवच्या संत गजानन महाराज संस्थान येथे दिली आहे. २६ जानेवारीला सकाळी वाजून ३८ ३९ मिनीटांनी ही देणगी दिल्याची नोंद पावतीवर आहे. त्यावर ओबामा, मोदी या दोघांची नावे असून त्यांच्या नावे दान देणा-या भाविकाने मात्र आपले नाव कळवले नाही.
प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारीला बराक ओबामा, नरेंद्र मोदी दिल्लीतील प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी झाले होते. त्याचवेळी एका भाविकाने त्यांच्या नावे संस्थानला दान दिले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त या दोन नेत्यांच्या नावाने शेगाव येथे आपण अभिषेक केल्याचे संबंधित भाविकाचे म्हणणे आहे. आपल्या देशाची ओळख ही जागतिक पातळीवर व्हावी अशी प्रार्थनाही या भाविकाने केली आहे. संत गजानन महाराज संस्थान शेगावच्या लाल रंगाच्या अधिकृत पावत्यांवर देणगीदार, पैसे घेणारा, व्यवस्थापकीय विश्वस्तांच्या स्वाक्षरी नाही. मोदी आणि ओबामा यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख आहे.
पावत्यांवर नावाचा स्पष्ट उल्लेख : देणगीपावतीवर 'नरेंद्र मोदी, पीएम, इंडिया' "मिस्टर बराक ओबामा, प्रेसिडेंट, यूएसए' असा नावाचा उल्लेख आहे. प्रत्येकी एकशे एक रूपये देणगी दिल्याची नोंद, पावती क्रमांक, दिनांक वेळ या बाबी पावतीवर नमूद केले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा, पंतप्रधान मोदींच्या नावाने श्री गजानन महाराज संस्थानला प्राप्त देणगीच्या पावत्या.