आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.Narendra Dabholkar Murder Case Killer No Found

डॉ.दाभोलकरांच्या मारेकर्‍यांना पकडण्यात पोलिस अपयशी;अमरावतीत ‘रास्ता रोको’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अमरावती- अंधर्शद्धा निर्मूलन समितीचे अर्धव्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला महिना उलटला असताना अद्यापही मारेकर्‍यांचा शोध लागलेला नाही. या मुद्दय़ावर संतप्त झालेल्या शिवराज्य पक्षाने मंगळवारी शेगाव नाका चौकात रास्ता रोको केले. पोलिसांनी आंदोलन हाणून पाडल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या बाजूला निदर्शने केली व घोषणा दिल्या.

डॉ. दाभोलकरांच्या हत्येने संपूर्ण राज्य हादरून गेले होते. त्यांच्या हत्येला आता महिना झाला असूनदेखील मारेकरी व मुख्य सूत्रधार पकडण्यात राज्याच्या पोलिसांना यश आले नाही. आपला रोष व संताप व्यक्त करण्यासाठी शिवराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

जिल्हाध्यक्ष डॉ. राजेंद्र कोकाटे यांच्या नेतृत्वात चौकात निदर्शने करून रस्त्यावरील वाहनांना रोखण्याचा होत असलेला आंदोलकांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. आंदोलनामध्ये वरद इंगोले, संजय ठाकरे, राहुल पाटील, मनोज मोरे, शुभम शेरेकर, सचिन काकडे, संदीप गावंडे, शरद काळे, शुभम तिडके, सुनंदा खरड, गीता ढवक, प्रभा आवारे, सुशीला देशमुख, कांचन उल्हे, कीर्तिमाला चौधरी, विजया कोकाटे, नंदा र्शीरामे, नलिनी चौधरी, स्मिता घोगरे, अँड. शेख सुलतान, बबन आवारे यांच्यासह शिवराज्य पक्षाचे शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.