आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr. Prakash Amate And Mandakini Amate Got Jaitai Award

डॉ. आमटे दाम्पत्याला जैताई मातृगौरव पुरस्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वणी - येथील श्री जैताई देवस्थानतर्फे दिला जाणारा यंदाचा प्रतिष्ठाप्राप्त जैताई मातृगौरव पुरस्कार हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाचे शिल्पकार डॉ.मंदाकिनी डॉ. प्रकाश आमटे यांना जाहीर झाला असून, २९ सप्टेंबरला हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

डॉ. प्रकाश डॉ.मंदाकिनी आमटे यांच्या जीवनकार्यावर आधारीत डॉ. समृद्धी पोटे दिग्दर्शित डॉ. प्रकाश बाबा आमटे दि रियल हिरो हा चित्रपट १० ऑक्टोंबरला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर २९ सप्टेंबरला श्री जैताई देवस्थानचा हा पुरस्कार आमटे दाम्पत्यांना प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रसिद्ध दिग्दर्शिका अॅड. समृद्धी पोटे या उपस्थित राहणार आहेत. पुरस्काराचे हे सहावे वर्ष असून, यापूर्वी हा पुरस्कार साधनाताई आमटे, सिंधुताई सपकाळ, डॉ. राणी बंग, डॉ. स्मिता कोल्हे, अॅड. अपर्णा रामतीर्थकर यांना देण्यात आला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन माधव सरपटवार यांनी केले आहे.