आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. जाणे, डॉ. सोमवंशी यांना पोलिसांची नोटीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - गेल्यासहा दविसांपासून पीडीएमसीच्या डनि पदासाठी सुरू असलेल्या वादात पोलिसांनी गुरुवारी मध्यस्थीचा प्रयत्न केला. पोलिस उपायुक्तांनी डॉ. जाणे, डॉ. सोमवंशी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या सचिवांना कक्षात बोलवले होते. मात्र चर्चेअंती सकारात्मक तोडगा निघाला नाही. त्यामुळे पोलिसांनी डॉ. जाणे डॉ. सोमवंशी या दोघांनाही फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १४९ अन्वये नोटीस बजावली आहे.
आरोग्य विज्ञान विद्यापीठने दिलेल्या आदेशानुसार डॉ. सोमवंशी यांनी डनिपदाची सूत्रे घेतली. मात्र, सद्या कार्यरत असलेले डॉ. जाणे डीनच्सया खुर्चीवर कायम आहेत. अशावेळी पीडीएमसीचे डनि कोण, हा प्रश्न उपस्थित होत आहे. सोमवार मंगळवारी या डीनच्या कक्षाला कुलूप लागले होते. डॉ. जाणेंनी कुलूप लावल्यानंतर दुसऱ्या दविशी डॉ. सोमवंशी यांनी कुलुपावर कुलूप लावले. तत्पुर्वीच डॉ. जाणे यांनी तर बुधवारी डॉ. सोमवंशी यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. भविष्यात या प्रकरणाचे वाईट पडसाद उमटू नये म्हणून पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तसेच या प्रकरणी संस्थेची बाजू जाणून घेण्यासाठी पोलिसांनी गुरूवारी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. शेळके सचिव वि. गो. भांबुरकर यांना पत्र पाठवून बोलावले होते. अध्यक्ष शेळके आले नाहीत मात्र सचिव भांबुरकर, डॉ. जाणे डॉ. सोमवंशी हे ितघेजण उपायुक्त घार्गे यांच्याकडे हजेरी लावली. डॉ.. सोमवंशी यांनी सांगितले कि, मी उद्या (शुक्रवारी) डनिच्या कक्षात जाऊन बसणार आहे. यावर डॉ. जाणे यांनी, मला संस्थेने अद्याप पत्र दिलेले नाही त्यामुळे सध्या मीच डनि असून, मी माझ्या कामावर जाणार असल्याचे सांगितले. या प्रकारामुळे वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाद झाल्यास किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नरि्माण झाल्यास पोलिसांना हस्तक्षेप करावा लागणार आहे. त्याच आशयाची नोटीस पोलिसांनी दोघांनाही दिलेली आहे.
पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांच्याशी गुरुवारी चर्चा केल्यानंतर बाहेर पडताना डॉ.. जाणे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव भांबुरकर डॉ. सोमवंशी.सचिव भांबुरकर म्हणाले, निर्णय घेण्यासाठी ३० दविसांचा अवधी : याप्रकरणात संस्थेचा अजून निर्णय झालेला नाही. विद्यापीठच्या निर्णयामध्ये ३० दिवसांत निर्णय घ्यावा,असे नमूद आहे. त्यामुळे आम्ही ३० दिवसांत निर्णय घेऊ. ही निर्णयाची प्रत आम्हाला २३ मार्चला मिळाली आहे. त्यामुळे २२ एप्रिलपर्यंत आम्ही निर्णय घेऊ शेकतो, असे भांबुरकर यांनी सांगितल्याचे पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी सांगितले. सचिव भांबुरकर उपायुक्त घार्गे यांच्या कक्षात आले होते. या चर्चेनंतर भांबुरकर यांच्याशी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी बोलण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी बोलायचे टाळले.
डॉ. सोमवंशीनी मागितली सुरक्षा: शुक्रवारीडॉ. सोमवंशी डनिच्या कक्षात जाणार आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडायला नको म्हणून डॉ. सोमवंशी यांनी स्वत:साठी पोलिस सुरक्षा मागितली होती. मात्र पोलिस उपायुक्तांनी त्यांना तुर्तास सुरक्षा देण्यास नकार दिला आहे. मात्र तरीही डॉ.. सोमवंशी शुक्रवारी सकाळी पीडीएमसीमध्ये जाणार असल्याचे समजले आहे.
दोघांनाही नोटीस बजावली
आम्ही गुरूवारी डॉ. जाणे, डॉ. सोमवंशी सचिव भांबुरकर यांच्यासोबत चर्चा केली. ३० दिवसात निर्णय घेऊ असे सचिवांनी सांगितले. तर डॉ. सोमवंशी शुक्रवारी पीडीएमसीमध्ये जाणार असल्याचे सांगितले आहे. अशावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नरि्माण होऊ नये म्हणून डॉ. जाणे डॉ. सोमवंशी यांना नोटीस बजावली आहे.
- सोमनाथ घार्गे,पोलिस उपायुक्त.