आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन अजगरांना दिले जीवदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - भातकुली तालुक्यातील परलामलगतच्या शिवारात बुधवारी (दि. १२) सकाळच्या सुमारास प्रातर्विधीसाठी गेलेल्या लोकांना दोन मोठे अजगर दिसून आले. त्यांनी ही माहिती अमरावती येथील वाइल्ड अॅनिमल्स सिक्युरिटी स्टडी अँड रिसर्च सेंटर (वसा ग्रुप)ला कळवली.
वसाच्या सर्पमित्रांच्या चमूने घटनास्थळी जाऊन नर आणि मादी अशा दोन अजगरांना पकडले.
प्रथम तपासणीत आठ फूट तीन इंचचा नर आणि एक मध्यमवयीन पाच फूट ११ इंच मादी अजगर असल्याचे स्पष्ट झाले आहे. बडनेरा वनविभागामध्ये या दोन्ही अजगरांची नोंद पंचनामा केला. त्यानंतर वनाधिकाऱ्यांच्या समक्ष त्या अजगरांना जंगलात सोडून देण्यात आले. या वेळी सर्पमित्र अजय चोरपगार, भूषण सायंके, मुकेश मालवे, पंकज मालवे, जगदीश शेंडे, सागर श्रुंगारे, रितेश हंगरे, निखिल फुटाणे, अनिकेत बिडवाइक, राहुल मावस्कर, शुभम उमाळे, निखिल रहाटे, शुभम कडू यांच्यासह अन्य वनाधिकारी उपस्थित होते, अशी माहिती वसा ग्रुपचे सहसचिव रितेश हंगरे यांनी दिली आहे.