आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२८ गावांमध्ये पाणीटंचाई! २८ गावे टंचाईग्रस्त यादीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्‍ह्यातील४६ गावांचा टंचाईग्रस्त आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. पर्जन्यमान भूजल पातळीच्या आधारावर या गावांमध्ये पाणीटंचाई भेडसावणार, असा अंदाज भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा विभागाने वर्तवला आहे. भूजल पातळीमध्ये घट नसली; तरीही लघु पाणलोट क्षेत्रनिहाय निरीक्षण विहिरींच्या भूजल पातळीमध्ये झालेली घट लक्षात घेता टंचाईग्रस्त गावांची यादी तयार करण्यात आली आहे. ४६ गावांपैकी १८ टँकरग्रस्त, तर २८ गावांच्या पाणीपातळीत घट झाली आहे.

जिल्‍ह्याचे सरासरी पर्जन्यमान ८१४.४९ मिलिमीटर असून, यावर्षी प्रत्यक्षात सप्टेंबरपर्यंत ७७०.१५ मिलिमीटर पर्जन्यमान झाले आहे. पर्जन्यमानाची टक्केवारी ९६.३८ आहे. अमरावती, चांदुर रेल्वे, भातकुली, तिवसा, वरुड, मोर्शी, धारणी, चिखलदरा धामणगावरेल्वे तालुक्यांमध्ये भूजलपातळीत शून्य ते एक मीटरने, तर चांदूरबाजार, अंजनगावसुर्जी, अचलपूर, नांदगांव खंडेश्वर दर्यापूर या तालुक्यांमध्ये एक ते दोन मीटरने वाढ झाली आहे.

उपाययोजना महत्त्वाच्या
जलस्रोतबघून पाण्याची बचत तसेच जास्त उपसा करता हव्या तितक्याच पाण्याचा वापर करावा. वनराई बंधारा तयार करून पाण्याची बचत करावी. शेताच्या बाजूला बांध टाकून पाणी अडवावे. त्याचप्रमाणे विहिरीच्या बाजूने खड्डा खोदून त्यामधील पाणी विहिरीत सोडल्यास भूजल पातळीत वाढ होईल पाण्याची टंचाई भासणार नाही.

पाण्याची सर्वच मार्गांनी व्हावी बचत
सप्टेंबरमधीलनिरीक्षणानुसार भूजल पातळीत ०.७८ मिलिमीटरची वाढ झाली. त्यामुळे, कुठल्या पद्धतीने पाण्याची बचत होईल, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ‘जल है, तो कल है’, हे लक्षात घेऊन पाण्याचा अपव्यय टाळावा. व्ही.एस. कराड, वरिष्ठभूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा.

२८ गावे टंचाईग्रस्त यादीत
२८गावांमध्ये टंचाईची शक्यता भूजल सर्वेक्षणने वर्तवली आहे. मोर्शी, अमरावती, भातकुली, चांदूर रेल्वे धारणी तालुक्यांचा यात समावेश आहे. मोर्शीतील १६६ समाविष्ट गावांपैकी पिंपळखुटा, ममदाबाद, तळणी भालोद; अमरावतीतील १३० समाविष्ट गावांपैकी नया अकोला, आमला, नांदुरा बु., सालोरा बु., वलगाव, माहुली जहांगीर आदी; भातकुलीतील मार्की, हातखेडा इस्लामपूर, रामा अफजलपूर, नारायणपूर घ्रुष्णापूर गावांचा समावेश आहे. चांदूररेल्वेतील राजुरा, काणस, एकपाळा. धारणीतील भोंडीलावा काटकुंभचा समावेश.