आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Drinking Water Problem,latest News In Divya Marathi

रस्ता बांधकामामुळे पिण्याच्या पाण्याचे वांधे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- विकासकार्याच्या बांधकामामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचे वांदे होत असल्याची गंभीर बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. कॅम्प परिसरात सुरू असलेल्या बांधकाम दरम्यान घरगुती नळाचे कनेक्शन तोडण्यात आले. या प्रकारामुळे मात्र नागरिकांवर मनस्ताप सहन करण्याची वेळ येत आहे.
कॅम्प परिसरातील केशव कॉलनी विद्याभारती महाविद्यालयासमोर रस्ता दुरूस्तीचे काम सुरू आहे. मागील सहा ते सात महिन्यांपासून सुरू असलेले बांधकाम अतिशय संथ गतीने केल्या जात असल्याने नागरिकांना असुविधेचा सामना करावा लागत आहे. विकास कामासाठी खोदकाम करताना अनेक घरगुती नळाच्या पाइपलाइन तोडल्या जात आहे. घरगुती पाईपलाईन तोडण्यात आल्यानंतर पुन्हा दुरुस्त करुन देण्याची जबाबदारी कंत्राटदाराची आहे. मात्र पाईपलाईन तोडल्यानंतर त्याचा भूर्दंड नागरिकांना सोसावा लागत आहे.
नगरोत्थान योजनेतून विद्याभारती महाविद्यालयाच्या समोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे. शहरातील इतर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असताना चकाचक असलेल्या रस्त्यावर होणाऱ्या खर्चाचे कारण गुलदस्त्यात आहे. विद्यमान आमदार रावसाहेब शेखावत यांच्या कुटुंबीयांचे महाविद्यालय याच रस्त्यावर आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गेट समोरील बाजूस येथून पोलिस मुख्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याचे बांधकाम केले जात आहे. आधी रस्त्याच्या कडेला खोदकाम करण्यात आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरगुती नळाच्या पाईपलाईनचे नुकसान कंत्राटदाराकडून करण्यात आले होते. याविषयाला गांभिर्याने घेण्याची विनंती नागरिकांकडून करण्यात आली आहे. कॅम्प परिसरात रस्त्याच्या कडेला अशा प्रकारे नळाच्या पाइपलाइन तोडण्यात आल्या आहेत.
कारवाई झाल्याने ठेकेदाराचे वाढले मनोबल
मागीलकाही महिन्यांपूर्वी याच परिसरात घरगुती पाईपलाईन तोडत पाण्याची चोरी करण्याचा प्रकार उघडकीस आला होता. नागरिकांकडून तक्रार करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून केवळ पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात आली. मात्र कार्यकारी अभियंत्याकडून कोणत्याची प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याचे दिसून आले. मजीप्राकडून कोणतीही कारवाई झाल्याने कंत्राटदाराचे मनोबल वाढत असल्याचे दिसून येत आहे.