आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीआरएम यांनी केली रेल्वेस्थानकांची पाहणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(विभागीय व्यवस्थापक सुधीरकुमार गुप्ता यांनी शुक्रवारी अमरावती येथील माॅडेल रेल्वेस्थानकाची पाहणी केली. छाया: मनीष जगताप )
अमरावती- मध्यरेल्वेच्या भुसावळ विभागाचे व्यवस्थापक (डीआरएम) सुधीर कुमार गुप्ता यांनी शुक्रवार, जुलैला अचानक बडनेरा अमरावती रेल्वेस्थानकांची पाहणी केली. डीआरएमपदी नियुक्त झाल्यानंतर गुप्ता यांचा बडनेरा अमरावतीचा पहिलाच दौरा होता. या दौऱ्यात त्यांनी दोन्ही स्थानकांचे निरीक्षक केले. सकाळी शालिमार एक्स्प्रेसने गुप्ता बडनेरा रेल्वेस्थानकावर आले, तर दुपारी सव्वा दोन वाजता महाराष्ट्र एक्स्प्रेसने भुसावळला परतले.
दरम्यान, बडनेरा स्थानकावर आगमन झाल्यानंतर त्यांनी लगेचच निरीक्षण करण्यास सुरुवात केली. बडनेरा येथील कॅन्टीनचे टेंडर, आेव्हरब्रीज ऑटो स्टँडसंदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तथापि, इतर दिवशी बडनेरा रेल्वेस्थानकावर जागोजागी फलाटावर कचरा साचून राहत असल्याचे चित्र पाहायला मिळाले असते. परंतु, डीआरएम येणार असल्याने संपूर्ण रेल्वेस्थानक चकाचक करण्यात आले होते. एरवी अस्वच्छ असणारे रेल्वेस्थानक शुक्रवारी एकदम स्वच्छ करण्यात आल्याने प्रवासी आश्चर्यचकित झाले. नियमित रेल्वेस्थानक असेच स्वच्छ असावे, अशा प्रतिक्रिया या वेळी प्रवाशांनी दिल्या.
याप्रसंगी डीआरएम गुप्ता यांच्यासोबत डीसीएम टी. जाधव, सीनिअर डीईएन, सीनिअर डीएमई, बडनेराचे स्टेशन मास्तर आर. टी. कोटांगळे, अमरावतीचे मॉडेल रेल्वेस्थानकाचे स्टेशन मास्तर जी. बी. गुजर, अमरावती तिकीट विभागाचे डी. व्ही. धकाते तथा बडनेरा अमरावतीचे इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
विभागीय व्यवस्थापक गुप्ता यांच्या सूचना
अमरावतीरेल्वेस्थानकावरील पीट लाइन येथे लाइटची व्यवस्था नाही. शिवाय या ठिकाणी मोकळी जागा फार असल्याने परिसरदेखील अस्वच्छ आहे. या ठिकाणी लाइटची व्यवस्था केली जावी. तथा या परिसराला कुंपण लावून परिसर सुरक्षित करण्याचे आदेश गुप्ता यांनी दिले, तर बडनेरा येथील रेल्वेस्थानकावर आेव्हरब्रीज, ऑटो स्टँड कॅन्टीनसंदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या. पुढील तीन महिन्यांत हे सर्व कामे करण्याचे आदेश त्यांनी या वेळी अधिकाऱ्यांना दिले.
शालिमारने आले अन् महाराष्ट्र एक्स्प्रेसने परतले
सकाळीसाडेनऊ वाजता डीआरएम गुप्ता यांचे हावडा-कुर्ला शालिमार एक्स्प्रेसने बडनेरा स्टेशनवर आगमन झाले. बडनेरा स्थानकावर आल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी बडनेरा रेल्वेस्थानकाचे निरीक्षक केले. त्यानंतर ते वाहनाने अमरावती रेल्वेस्थानकावर आले. अमरावती रेल्वेस्थानकाचे निरीक्षण केल्यानंतर पुन्हा ते आपल्या वाहनाने बडनेरा येथे पोहोचले. बडनेरा येथे आल्यानंतर काही वेळ त्यांनी निरीक्षण केले. अल्पोपाहार घेऊन दुपारी महाराष्ट्र एक्स्प्रेसने ते भुसावळ परतले. डीआरएम झाल्यानंतर त्यांनी बडनेरा अमरावती
रेल्वेस्थानकाला ही पहिली भेट होती.
माॅडेल रेल्वेस्थानकावर कौतुकाचा वर्षाव
अमरावतीरेल्वेस्थानक हे खरोखरंच मॉडेल रेल्वेस्थानक आहे. येथील परिसर एेसपैस भरपूर मोकळा आहे. विशेष म्हणजे, येथील परिसर स्वच्छ नीटनेटका आहे. येथील साफसफाई प्रशस्त मोकळा परिसर बघून मन प्रसन्न होते, असे गौरवोद््गार काढून डीआरएम गुप्ता यांनी अमरावती मॉडेल रेल्वेस्थानकावर कौतुकाचा वर्षाव केला. दुसऱ्यांदा कुठल्याही कामाने स्थानकावर आल्यानंतरही हा परिसर असाच स्वच्छ दिसायला हवा. तेव्हा रेल्वे प्रशासनासह नागरिकांमध्ये स्वच्छतेसंदर्भात जनजागृती वाढली आहे, असे म्हणता येईल. प्रवाशांनीही स्थानक आपले समजून कचरा करण्याचे आवाहन गुप्ता यांनी केले.