आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Drunk And Drive Issue On Thirty Frist At Amaravati

कठोर उपाययोजना: वाहनचालक ‘तळीरामां’ची ‘थर्टी फस्ट’पोलिस ठाण्यात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- ‘थर्टी फर्स्ट’ला मद्य प्राशन करून वाहन चालवताना आढळणार्‍या ‘तळीरामां’ना पोलिस तत्काळ कारवाई करून रात्रभर ठाण्यात ठेवणार आहेत. त्यामुळे त्यांची नववर्षाची पहाट पोलिस ठाण्यात उजडेल, असे सुतोवाच पोलिस आयुक्त अजित पाटील यांनी शुक्रवारी दिले.
नवीन वर्षाच्या आनंदात आदल्या रात्री उशिरापर्यंत बीअर बार, रेस्टॉरेंट सुरू ठेवण्याची परवानगी शासनाकडूनच देण्यात येते. त्यामुळे तळीरामांसाठी ‘थर्टी फर्स्ट’ आनंदाची पर्वणीच ठरतो. मद्य प्राशन करून वाहन चालवणे वाहतूक कायद्यानुसार गुन्हा आहे. त्यांचे प्रमाण नववर्षाच्या पूर्वसंध्येला अधिक असल्याने ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ मोहीम पोलिसांकडून या कालावधीमध्ये राबवण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिस ब्रिथ अ‍ॅनालायझरची मदतसुद्धा घेणार आहेत. शहर वाहतूक पोलिसांकडे दोन ब्रिथ अ‍ॅनालाझर आहेत. ‘थर्टी फर्स्ट’पूर्वी पोलिस आणखी ब्रिथ अ‍ॅनालायझर खरेदी करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्या दृष्टीने तयारीसुद्धा सुरू झाल्याची माहिती आयुक्त अजित पाटील यांनी सांगितले. या दृष्टीने शहरातील प्रत्येक पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना सूचना देण्यात आल्या असून, या बाबत गांभीर्याने कारवाई करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

अधिवेशनानंतर अतिक्रमण निर्मूलन मोहीम होणार तीव्र
नागपूर येथील हिवाळी अधिवेशन आटोपताच शहरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे. पोलिसांच्या मदतीने ही मोहीम राबवण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाने पोलिस आयुक्तांना पत्र देऊन मोहिमेसाठी बंदोबस्ताची मागणी केली होती. आयुक्तांनी ही मागणी मंजूर केली आहे. महापालिकेकडे बंदोबस्तासाठी पाठवलेल्या मनुष्यबळाची 27 लाख 71 हजार 305 रुपयांची रक्कम थकीत होती. त्यामुळेच मध्यंतरी पोलिसांकडून महापालिकेला बंदोबस्त पुरवला जात नव्हता. मात्र, महापालिकेने पोलिसांना 19 लाख रुपयांची थकीत रक्कम दिली आहे. त्यामुळे महापालिकेला आता आवश्यक तेवढा पोलिस बंदोबस्त पुरवला जाणार असल्याचे आयुक्त अजित पाटील यांनी सांगितले.