आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटनाला बसताहेत उन्हाळ्याचे तीव्र चटके, पानवठे आटले; डोंगर झाले बोडके

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- मे महिन्यातील उन्हाच्या तीव्रतेचे चटके सध्या चिखलदरा परिसरातील पर्यटनालाही सोसावे लागत आहेत. एरवी हिरवाईने नटलेला हा परिसर सध्या उन्हामुळे शुष्क दिसत आहे. डोंगर पायथ्याशी असलेली आदिवासी बांधवांची शेतंही रिकामी झाली आहेत. सध्या उजाड माळरान आणि पानगळ झालेली वृक्ष येथे पहायला मिळतात.
आपल्या सौंदर्याने संपुर्ण महाराष्ट्रातील पर्यटकांचे लक्ष वेधणाऱ्या चिखलदरा परिसरातील धबधबेही सध्या बंद झाले आहेत. परिसरातील पानवठे कोरडे पडले आहेत. डोंगरपायथ्याची जमीन कसून येथील आदिवासी आपला उदरनिर्वाह करतो पण सध्या शेतही रिकामी झाल्याने डोंगरावरच्या लाल मातीतील पाऊल वाटा उंचावरून ठळक दिसून येतात.

नागमोडी वळणाची रस्तेही सध्या निर्मनुष्य झाली आहेत. थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिखलदरा तालुक्यात उन्हाचे चांगलेच चटके सोसावे लागत आहेत. परिसरातील धबधब्यांचा खळखळाट मंदावला आहे, तर लहान लहान पानवठे कोरडे झाल्याने वन्य प्राणी पक्ष्यांची भटकंती होत आहे.
पावसाळ्यात चिखलदरा पर्यटकांच्या गर्दीने फुलून निघते. विविध जिल्ह्यातून खाजगी वाहनाद्वारे लोक येथे येतात. पण विदर्भात सध्या तीव्र उन्ह जाणवत असल्याने पर्यटकांनी या परिसराकडे पाठ फिरवलेली दिसते. मी सकाळपासून मित्रांसोबत विविध स्पॉट पाहून आलो आहे. पण चार दोन लोकांशिवाय कुणी दिसले नाही.
- नंदकिशोर चव्हाण, पर्यटक.

पावसाला हिवाळ्यात पर्यटकांची चिखलदरा तालुक्यात वर्दळ असल्याने दुग्धजन्य पदार्थ, शहद, कॉफी, बांबूपासून तयार केलेल्या शोभेच्या वस्तू विकून आदिवासी बांधव आपला उदरनिर्वाह करतात. मात्र उन्हाळ्यात पर्यटकांची गर्दीही राहत नाही त्यामुळे या काळात महानगरांमध्ये जाऊन मिळेल ते काम करण्याची पाळी आदिवासी बांधवांवर आली आहे.

आपल्या हिरवळीनं पर्यटकांचे लक्ष वेधून घेणारा चिखलदरा तालुक्यातील डोंगरदऱ्यांचा प्रदेश मे महिन्यातील उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे शुष्क झाला आहे. डोगर पायथ्याच्या लाल मातीत ठळक दिसणाऱ्या पाऊलवाटा, रस्त्यावर झालेली पानगळ पाहून पर्यटक या परिसराचे गुणगान गात आहे.